पुसेसावळीत गणेशोत्सवाच्यानिमित्ताने श्री सावळेश्वर व्यापारी मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

 


श्री सावळेश्वर गणेशोत्सव मंडळाची गणेशमुर्ती

पुसेसावळी | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
पुसेसावळी ता.खटाव येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे श्री सावळेश्वर व्यापारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली.यंदा मंडळाचे 51 वे सुवर्णमहोत्सवी वर्ष असुन बुधवार दि.31 ऑगस्ट रोजी श्री गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना व रात्री सदगुरु हैबती महाराज भेदीक मंडळाचा गायनाचा कार्यक्रम आयोजित केला असुन,गुरुवार दि.1 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 वा. "आई-पाझर वात्सल्याचा"या विषयावर दिपाली किरण लोखंडे यांचे समाजप्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित केले आहे,शुक्रवार दि.2 सप्टेंबर रोजी सत्यनारायण महापुजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असुन रात्री 9.30 वा.अक्षय तेली यांचे समाजप्रबोधनपर व्याख्यान आयोजित केले असुन याबरोबरच समाजप्रबोधनात्मक जिवंत देखावा, रांगोळी,चित्रकला,स्लो सायकल,दोर उडी,लिंबू चमचा,संगीत खुर्ची स्पर्धा,हळदीकुंकु,अथर्वशीर्ष पठण, सर्वरोग निदान शिबीर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे,तरी पुसेसावळी व परिसरातील गणेश भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सावळेश्वर व्यापारी गणेशोत्सव मंडळ व सावळेश्वर चॅरीटेबल ट्रस्ट यांच्यावतीने करण्यात आले आहे.