कोयना वसाहत ग्रामपंचायतीवर डॉ.अतुल भोसले गटाची सत्ता कायम तर विरोधी महाविकास आघाडीचा धुवा

 


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
कराड तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोयना वसाहत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. ४) मतदान पार पडले. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत भाजप समर्थक आघाडीने ११ पैकी १० जागांवर विजय संपादन करत, विरोधी महाविकास आघाडी समर्थक गटाचा धुव्वा उडविला. महाविकास आघाडी समर्थक गटाला एकाही जागेवर विजय संपादन करता आला नसून, एका जागेवर मात्र अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

या निवडणुकीत भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.अतुल भोसले समर्थक स्व. राजेंद्र पाटील कोयना विकास आघाडीचे उमेश दिगंबर कुलकर्णी, संगीता सूर्यकांत पाटील, विनायक दत्तात्रय कुलकर्णी, चंद्रशेखर हणमंतराव पाटील, सुवर्णा राजेंद्र वळीव, शीतल राहुल जाधव, कुसुम पांडुरंग पुजारी, सम्राट अविनाश पाटील, रजनी अशोक गुरव, सुनीता तानाजी भोसले यांनी मताधिक्य घेत घवघवीत यश संपादन केले. तर आ. पृथ्वीराज चव्हाण, उदयसिंह पाटील - उंडाळकर व मनोहर शिंदे समर्थक जनशक्ती विकास आघाडीला मात्र एकही जागेवर विजय न मिळविता आल्याने, नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

या विजयानंतर स्व. राजेंद्र पाटील कोयना विकास आघाडीच्या सर्व विजयी उमेदवारांनी कृष्णा हॉस्पिटल येथील सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले आप्पासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले, श्री. विनायक भोसले यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.