श्री संतकृपा शिक्षण संस्थेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. प्राजक्ता जोहरी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न.

संस्थेच्या संचालिका सौ. प्राजक्ता जोहरी ध्वजारोहण करताना.

घोगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेत 75 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या प्रांगणात ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. 

संस्थेच्या संचालिका सौ. प्राजक्ता जोहरी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन केले व अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमात उत्साहाचा रंग भरला. विद्यार्थिनींनी देशभक्तीची गाणी सादर केली.

 यानंतर संस्थेचे सचिव प्रसून्न जोहरी यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना मार्गदर्शन केले व भविष्यातील संस्थेचे स्वप्न, ध्येय सर्वांसमोर मांडले. 

 यावेळी उत्कृष्ट कार्याबद्दल बी. टेक चे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, बी. फार्म फार्मसी चे प्राचार्य डॉ. विजयानंद अरलेलीमठ,बी. टेक चे रजिस्ट्रार संतोष पाटील, बी फार्मसी चे कार्यालयीन अधीक्षक संतोष कोळेकर यांना यावेळी संस्थेच्या वतीने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच इयत्ता बारावी सायन्स मध्ये प्रथम येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

या अमृत महोत्सवी ध्वजारोहण समारंभास संस्थेचे सचिव प्रसून जोहरी, संस्थेच्या उपाध्यक्षा सौ अनुराधा गांधी, संचालिका सौ. प्राजक्ता जोहरी, संचालक शंतनू गांधी यांची विशेष उपस्थिती होती तसेच बी.टेक.चे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, बी. फार्मसी चे प्राचार्य डॉ. विजयानंद अरलेलीमठ ,डी फार्मसी च्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, जुनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ. पुष्पा पाटील, इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सौ सुप्रिया पाटील आदी मान्यवर या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात उपस्थित होते.

तसेच सर्व महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने या अमृत महोत्सवी समारंभास उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुनिता सुतार यांनी मानले.