शिवछ्त्रपती प्रतिष्ठान व डॉ.प्रदीप पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने त्वचारोग निदान व उपचार शिबीर संपन्न..

 शिवछ्त्रपती प्रतिष्ठान, येळगाव व पुणे येथील श्री:त्वक हॉस्पिटलचे त्वचारोग तज्ञ लेप्टनंट कर्नल डॉ.प्रदीप पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने  त्वचारोग निदान व उपचार शिबीर संपन्न.

येळगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, कम्युनिटी डर्मेटोलॉजी डे चे औचित्य साधून शिवछ्त्रपती प्रतिष्ठान, येळगाव व पुणे येथील श्री:त्वक हॉस्पिटलचे त्वचारोग तज्ञ लेप्टनंट कर्नल डॉ.प्रदीप पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने  त्वचारोग निदान व उपचार शिबीर कराड येथे संपन्न.

शिवछ्त्रपती प्रतिष्ठान, येळगांव, ता. कराड व सामाजिक कार्यकर्ते लेप्टनंट कर्नल डॉ.प्रदीप पाटील सद्या बाणेर, पुणे येथे श्री:त्वक स्कीन, हेअर अँड लेझर क्लिनिक चालवत आहेत. तसेच ते चेलाराम हॉस्पिटल येथे कन्स्लटंन्ट म्हणूनही कार्यरत आहेत. यांच्या संयुक्त विद्यमाने

सामाजिक सेवा म्हणून या शिबिराचे आयोजन केले होते. खास करून  ग्रामीण भागातील रुग्णांना याचा जास्तीत जास्त लाभ व्हावा यासाठी कराड येथील मध्यवर्ती प्रभात टॉकीज जवळ त्वचरोग निदान, शिबीर पार पडले. तपासणी सोबतच मोफत औषधाचे वाटपही करण्यात आले. याचा अनेक रुग्णांनी  लाभ घेतला. या शिबिराकरिता चैतन्य मेडिकल चे श्री अमोल व हॉस्पिटल ऍडमिन सलीम सय्यद यांचेही बहुमोल सहकार्य लाभले. 

शिवछत्रपती प्रतिष्ठान ही समाजिक ट्रस्ट विविध समाजिक उपक्रम राबवत असते. या उपक्रमांचा एक भाग म्हणून नियमित आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते यासाठी डॉ.पाटील सरांचे खुप महत्वपूर्ण योगदान लाभत असते. त्याच बरोबर लायन्स क्लब, प्राथमिक आरोग्य केंद्र, येळगाव चे वैद्यकीय अधिकारी डॉ.  पाटील, डॉ. डांगे मॅडम व त्यांचा सर्व स्टाफ यांची ही मदत होत असते. भविष्यात अजून मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन ट्रस्ट च्या वतीने करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रशांत शेवाळे यांनी सांगितले. यावेळी प्रतिष्ठान चे पदाधिकारी उपस्थित होते.