आ.शंभूराज देसाई यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागणार? 'हे' खाते मिळण्याची दाट शक्यता?


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
मंत्रिमंडळ विस्ताराचा अखेर मुहूर्त ठरला असून उद्याच शिंदे गटाचे मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल. शिंदे गटाचे 9 तर भाजपचे 9 एकूण 18 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.

या मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पाटण मतदार संघाचे आमदार आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास विश्वासू समजले जाणारे शंभूराज देसाई यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. 

आ. शंभूराज देसाई यांना ग्रामविकास किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

त्यामुळे पाटण तालुक्यात शंभूराज देसाई यांना कोणते खाते मिळणार याबाबत सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली आहे.

कार्यकर्त्यांना उद्याच्या मंत्री मंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. सातारा जिल्ह्यात राजकीय वर्तुळात चर्चेला वेग आला आहे. सर्वांच्या नजरा उद्याच्या मंत्री मंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत .

Popular posts
तळमावले येथील वाल्मिकी विद्यामंदिरात २५ वर्षानंतर भरला पुन्हा दहावीचा वर्ग
इमेज
येळगाव येथे मोफत त्वचा रोग निदान व औषधोपचार शिबीर संपन्न.
इमेज
जनविकास पतसंस्थेच्या आगाशिवनगर शाखेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
इमेज
सातारा जिल्ह्यातील संवादाचे जाळे अधिक मजबूत होणार : खा. श्रीनिवास पाटील
इमेज
जोपर्यंत माथाडी कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहिल: नरेंद्र अण्णासाहेब पाटील
इमेज