प्राना फाऊंडेशनच्या वतीने दहावी व बारावी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.


ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
सामाजिक बांधिलकी जपत प्राना फाऊंडेशन च्या वतीने विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नेहमीच करण्यात येते.

ढेबेवाडी विभागातील इयत्ता दहावी व बारावी च्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा प्राना फाऊंडेशन च्या वतीने शनिवार दि. १३ ऑगस्ट २०२२ रोजी सत्कार करण्यात येणार आहे.

उद्या सकाळी १०.०० वा. भाग्यश्री मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिगाडे पाटील कॉलेजचे प्रा.बाजीराव पाटील सर यांची उपस्थिती असणार आहे.

भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष मा. आ. नरेंद्र अण्णासाहेब पाटील , माजी कामगार उपायुक्त, महाराष्ट्र शासन श्री.अंकुशराव मोरे, सोना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संस्थापक श्री.सर्जेराव यादव यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक विभागाच्या श्रीमती पद्मावती कोळेकर मॅडम , गट शिक्षणाधिकारी पाटण श्रीमती दिपा बोरकर मॅडम व सौ. माधवीताई मोरे या उपस्थित राहतील .

विभागातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक व विद्यार्थी यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन प्राना फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.प्राची पाटील यांनी केले आहे.Popular posts
चक्क सुपारीवर साकारलं श्रीमहालक्ष्मीचं चित्र.
इमेज
मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.
इमेज
कराड जनता बँकेच्या 8 संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. न्यायालयाचा कराड बँकेच्या संचालकांना दणका
इमेज
काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचा झेप नियतकालिक अंक वेधक व प्रेरणादायक : संजय देसाई
इमेज
तळमावले बिट मध्ये, पोषण माह अभियान अंतर्गत सदृढ बालक बालिका स्पर्धा उत्साहात संपन्न.
इमेज