स्वयंसहायता समूहाने उत्पादित केलेल्या विविध वस्तूंसह गणपती सजावट व गौरी फराळ विक्री व प्रदर्शन

सातारकरांनी लाभ घेण्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे आवाहन 



सातारा दि. 29 : स्वयंसहायता समूहाने उत्पादित केलेल्या विविध वस्तूंसह गणपती सजावट व गौरी फराळ विक्री व प्रदर्शनाचे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे. या विक्री व प्रदर्शनास नागरिकांनी भेट देवून बचत गटांनी उत्पादीत केलेल्या मालाची खरेदी करावी, असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या प्रेरणेतून व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विनय गौडा आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांच्या संकल्पनेतून सहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे विक्री व प्रदर्शन 29 ऑगस्ट 2022 व मंगळवार 30 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते झाले.

    प्रदर्शनात स्वयंसहायता समूहातील महिलांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांसह गौरी गणपती सजावट साहित्य, फराळ पदार्थ आणि बरेच काही उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले आहे.