बृहन्मुंबई नागरी बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी गुलाबराव जगतापांची निवड


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : गेल्या ४४ वर्षांपासून मुंबईमध्ये नागरी सहकारी बँकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दी बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी माथाडी कामगार नेते व दी हिंदुस्थान को-ऑप बँकेचे अध्यक्ष गुलाबराव जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तर उपाध्यक्षपदी रामेश्वर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांची निवड करण्यात आली.

सहकार निबंधक कार्यालयाच्या निवडणूक अधिकारी श्रीमती बकुळा माळी यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.या निवडीनंतर या नागरी बँक्स असोसिएशनच्या नवनियुक्त संचालक मंडळातील सहकारीवृन्दानी गुलाबराव जगताप यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी अभ्युदय बँकेचे अध्यक्ष संदीप घनदाट,अपना बँकेचे अध्यक्ष दत्ताराम चाळके,सारस्वत बँकेचे संचालक किशोर रांगणेकर,सातारा सहकारी बँकेचे अध्यक्ष भाई वांगडे, भवानी सहकारी बँकेचे गणेश महाले तसेच तज्ञ संचालक सीताराम अडसूळ व असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली कदम आदि मान्यवर उपस्थित होते. गुलाबराव जगताप हे स्व.अण्णासाहेब पाटलांच्या माथाडी युनियनमध्ये कार्याध्यक्ष असून ते लोखंड व ब पोलाद बाजार समितीचे सलग १० वर्षे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.तसेच हिंदुस्थान सहकारी बँकेच्या प्रगतीचे शिल्पकार म्हणूनही त्यांना ओळखले जाते.