हो त्यांनी नुसता ब्रिटिश ऑफिसर ला काळा झेंडा दाखवलाच नाही तर मालदनच्या जुन्या पोलीस गेट वर चढून भारताचा तिरंगा फडकवला.

मालदन गावचे क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक स्व.पांडुरंग नारायण साळुंखे



जन्म आणि बालपण : 

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग नारायण साळुंखे (दादा ) हे मालदन गावाचे रहिवासी होते, ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सतत भाग घेत राहिले . ग्रामीण भागात राहून इंग्रज सरकार वर जेवढा जास्त दबाव टाकता येईल त्या प्रकारे टाकून इंग्रजांनी माघार घेण्यासाठी प्रयत्न केले. दादा सारख्या अश्या लाखो स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान आणि प्रयत्न आणि त्या प्रयत्नच यश म्हणजे भारताचे स्वतंत्र होय. 

 दादांचा जन्म १२ सप्टेंबर १९१७ रोजी कापील ता कराड या ठिकाणी झाला , अतिशय गरीब कुटुंबात जन्मास आलेले दादा यांचे मूळचे गाव दिक्षी तालुका पाटण हे होय . दादा दीड वर्षाचे असताना त्यांची आई साथीच्या रोगात तीव्र तापाने तिचा मृत्यू झाला , आईच्या मृत्यूनंतर दादांचा सांभाळ मालदान गावी असलेल्या मावश्या त्यांनी दादांचा सांभाळ केला. दादांचे वडील शेतकरी होते, काही वर्षानंतर म्हणजे दादा ४-५ वर्षाचे असताना देवीच्या रोगाने त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर मात्र दादा ना पूर्णपणे मावशींनी सांभाळले आणि दादा मालदन गावी स्थायिक झाले . 

शिक्षण :

 दादांनी जुन्यातील सातवी पूर्ण केली , मावशीला कोणीही अपत्य नसल्याने मावशीचा वारस हे दादाच होते . कुठेतरी नोकरी करून ५-१० रुपये पगार मिळवण्यापेक्षा त्यांनी शेती वर च भर दिला . दादा खूप वाचन करायचे. 

संस्कार :

दादा गांधी विचारसरणीचे होते , गांधीजींना खूप अनुसरण करत होते, गांधींच्या सभा ऐकणे, त्यांचे साहित्य वाचणे हा आवडता छंद होता. पण मधल्या काळात भगत सिंग व इतर यांचे जे असहयोग आंदोलन चिघळले , आणि महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटील आणि सातारा जिल्यातील इतर क्रांतिकारक यांनी सुद्धा समांतर लढा देण्याचं ठरवलं त्याचाच भाग म्हणून अनेक क्रांतिकारी युवक नाना पाटील यांच्याकडे आकर्षित झाले. त्याचाच एक भाग म्हणजे पांडुरंग नारायण साळुंखे. 

स्वातंत्र्य लढ्यातील सहभागी होण्यास प्रेरक घटना:

तसे पहिले तर दादांनी कधीही हिंसेला समर्थन दिले नव्हते , मात्र तो काळ होता साधारण १९३८- १९४० चा तेव्हा तरुण पिढीच्या डोक्यात एकच भिनत होते अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वतंत्र कधीही मिळणार नाही , आणि साहजिक तरुण क्रांतिकारकांचा कल असहयोग आंदोलन (Non Cooperation Movement) याकडे वळला. याचे नेतृत्व महाराष्ट्रातून नाना पाटील करत होते. त्याच दरम्यान गांधीजींनी छोडो भारत चा नारा दिला, अनेक क्रांतिकारक एकवटले गेले. 

ह्याचाच एक भाग म्हणजे मालदन गावातील पोलीस गेट वर झालेलं तरुण क्रांतिकारांचा आंदोलन , पोलीस गेट ला कोणी लोक गॅटी म्हणायचे. गॅटी म्हणजे इंग्रजांच्या काळातील पोलीस स्टेशन, जे छोटे जेल आणि स्टेशन असायचे त्यांना पोलीस गेट बोलायचे. पोलीस गेट ची निर्मिती हि फक्त राज कैदी आणि छोटे गुन्हेगार यांच्यासाठी केली गेली होती. जे कोण ब्रिटिश सरकार विरुद्ध बोलेल त्यांना पोलीस गेट मध्ये डांबलं जायचं तिथून तालुंका किंवा जिल्ह्याच्या जेल ला नेले जात. पोलीस गेट चा विपर्यास मालदन च्या लोकांनी गॅटी असा केला. पुढं सगळे त्याला गॅटी असच बोलत असत. साधारण मालदन ची गेट सुद्धा १९२५ ते १९३० या काळात बांधली गेली असावी. कोरीव दगडाच्या तोडी, मोठ्यामोठ्या शिळा, संपूर्ण सागवानी लाकडे, सागवानी दरवाजे, २५-३० एम एम चे गज, जाड सिमेंटचा पत्रा. प्रत्येक खोलीत संडास, बाथरूम, समोर भव्य असं कंपाउंड. पाठीमागे मैदान पुढे मैदान आणि संपूर्ण काळा रंग. हि अशी मांडणी होती पोलीस गेट ची. कित्तेक क्रातिकारकांना येतेच अटक केली गेली. श्री. पांडुरंग नारायण साळुंखे याना सुद्धा इथंच पकडलं आणि काहीदिवस इथंच ठेवले. पूढे त्यांना दुसऱ्या जेल मध्ये पाठवलं . पुढे इंग्रज भारत सोडून गेले आणि आमच्या गावच पोलीस स्टेशन ओस पडलं. ह्याच पोलीस गेट ने पाहिलेले एक क्रांतिकारक म्हणजे पांडुरंग नारायण साळुंखे . 

स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरी:

 ऑक्टोबर १९४१ मध्ये या तरुण कार्यकर्त्यांचा मालदन, मानेवाडी , ढेबेवाडी भाग असेल अगदी सांगली जिल्यातील सुद्धा काही लोक एवढ्या सर्वांचा एक प्लॅन ठरला होता , कोणीतरी एक इंग्रज अधिकारी ( केस ची बरीच माहिती घेतल्यानंतर ते नाव रीडर असे काहीतरी आहे कारण त्या नावाचा जास्त कुठेही उल्लेख नाही फक्त ब्रिटिश ऑफिसर अशी नोंद आहे ) हे जून च्या मध्यावर मालदन येथील पोलीस स्टेशन ला भेट देण्यासाठी येणार होते, भगत सिंग आणि चंद्रशेखर पंडितजी यांनी केलेली पोलीस अधिकाऱ्याची ची हत्या याला प्रवृत्त होऊन आणि गांधीजींच्या छोडो भारत आंदोलनाला अनुसरून काही तरुण कार्यकर्तांनी ठरवले होते ह्या ऑफिसर ला सुद्धा धडा शिकवायचा. त्याची हत्या करायची असा कुठलाही प्लॅन नव्हता , त्याला फक्त काळे झेंडे दाखवायचे होते आणि त्याला माघारी परतवायचे होते. ठरल्याप्रमाणे १७ ऑक्टोबर १९४१ रोजी सर्वजण पहाटे तयार च होते कोणी झाडावर कोणी कुठे लपून असे बसले होते. पहाटे ५ वाजत ब्रिटिश ऑफिसर यांचे आगमन झाले, इंग्रज सरकार मध्ये मोठे पद असल्या कारणाने त्यांच्या सोबत ६-७ जनाची त्यांची सिक्युरिटी होती मात्र ह्या ७-८ कार्यकर्त्यांनी कसलाही विचार न करता त्यांना काळे झेंडे दाखवण्यास सुरवात केली हे ७-८ क्रांतिकारी पुढे पुढे येत होते , इंग्रज चले जाव, रायडर चाले जाव ह्या घोषणा देत ते पुढे सरसावत होते . त्या इंग्रज ऑफिसर ने कोणताही धोका होऊ नये म्हणून ह्यांच्या पुढे हार मानली पुढे काहीतरी धोका होईल ह्या भीतीने पहाटेच तो घोडागाडीने परत जाण्यास निघाला. मग ह्या कार्यकर्त्यांनी त्यात सर्वात आघाडीवर दादा होते कारण ते इथले स्थानिक होते ह्यांनी पोलीस गेट वर चढुन भारताचा तिरंगा फडकावला. त्या काळात तिरंगा फडकवणे हा गुन्हा होता तेव्हा वेळेने पलटी खाली आणि ३०-४० पोलिसांनी संपूर्ण पोलीस गेट ला वेढा मारला . ३ क्रांतिकारक पळून गेले ४ जण सापडले त्यामध्ये मालदन गावातील दादा फक्त होते बाकी बाहेर गावचे तरुण क्रांतिकारी होते. ह्या सात आठ जणांनी पहाटे चार ते साडे पाच पर्यंत सर्व इंग्रज पोलीस आणि अधिकारी यांचावर वर्चस्व गाजवले होते मात्र ५.३० वाजता परिस्थिती बदलली आणि संपूर्ण मैदान ला ४०-५० पोलिसांनी वेढा घातला , जे लोक पोलीस गेट वर चढले होते ते अडकून पडले त्यातील ३ जण निसटले मात्र ४ जण पोलिसांच्या तावडीत सापडले. सापडल्या नंतर त्यांना साखळदंडात बांधण्यात आले , संपूर्ण सुरक्षेसह संपूर्ण गावभर धिंड काढण्यात आली. क्रांतिकारकाना वरून आदेश होते कोणतीही माहिती पोलिसांना सांगायची नाही म्हणजे कोणतेही सहकार्य करायचे नाही. त्यापद्धतीने दादा व इतर ३ यांनी कसलीच माहिती दिली नाही . पहिला दिवस मालदन येथील पोलीस स्टेशन मधेच ठेवण्यात आले. ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आपण आम्हास शरण या, माफी मागा आम्ही आपणस बिनशर्त सोडून देऊ. मात्र स्वातंर्त्याचे वारे नसानसात भिनलेले हे क्रांतिकारी माफी मागणाऱ्यातले नव्हते. पुढील २-३ दिवस सर्वाना टॉर्चर करण्यात आले , ४ पैकी २ जणांनी पुढील कारवाई च्या भीती पोटी माफी मागितली आणि आपली सुटका करून घेतली. पैकी २ जणांनवर कायदेशीर कारवाई करण्यात अली पाचव्या दिवशी दादांची रवानगी पाटण येथील जेल मध्ये झाली. कोर्टात केस चालू झाली , राज कैद्याची केस असल्याकारनाणे केस प्रक्रिया फर्स्ट प्रायोरिटी वर घेण्यात आली. दादांना सश्रम कारावासाची शिक्षा झाली . त्याच्यावरती विविध कलम अंतर्गत गुन्हे टाकण्यात आले होते. इंग्रज अधिकाऱ्याला मारणे किंवा कोणतीही हिंसा करणे हा हेतू ह्या क्रांतिकारकांचा अजिबात नव्हता मात्र त्याचा त्यांनी प्रयत्न केला आसा गुन्हा त्यांच्यावर नोंद झाल्यामुळे त्यांना सश्रम कारावासाची शिक्षा झाली. शिक्षा सुरवातीला ७ वर्षाची होती नंतर ती कमी करून ५.५ वर्षाची करण्यात आली. राजकैद्यांना जेल मध्ये असताना न्युज पेपर वाचणे, स्वतः लिखाण करणे (प्रकाशित करायला परवानगी नव्हती ) , आणि जेल मधील क्रांतिकारकांशी चर्चा करणे यासारख्या गोष्टींना परवानगी देण्यात अली होती. पुढे ३-४ महिन्यांनी त्यांना पुणे येथे पुढे विजापूर येथे आणि नंतर पुणे आणि सातारा असा त्यांचा जेल चा प्रवास झाला. 

मधल्या काळात संपूर्ण भारतातून अनेक क्रांतीकारकांना विनाकारण जेल मध्ये डांबले आहे म्हणून रान उठले होते, ज्या ज्या केसेस ची शंका होती त्या सर्व केसेस परत पटलावर घेण्यात आल्या. त्यात दादांची हि केस परत घेण्यात आली तेव्हा ते ब्रिटीश ऑफिसर यांची हि साक्ष घेण्यात आली आणि ती महत्वपूर्ण ठरली . तेव्हा म्हणजे १९४२ नंतर वातावरण बदलायला सुरवात झाली होती , लॉर्ड माऊंटबॅटन असतील किंवा त्यांच्या आदींचे व्हाईसरॉय असतील ह्यांनी थोडा भारताच्या बाजूने विचार करायला सुरवात केली. त्याचाच भाग म्हणजे त्या ब्रिटिश ऑफिसर चे स्टेटमेंट. " स्वातंत्र्य हि प्रत्येक भारतीयांसाठी काळाची गरज आहे, आणि आम्ही सुद्धा त्यासाठी प्रयत्नशील आहोत , अन्न वस्त्र आणि निवारा जशी मूलभूत गरज प्रत्येकाला तशी भारताला स्वातंत्र्य गरजेचे आहे. ह्या कार्यकर्त्यांकडून मला इजा पोहचवण्याचा कोणताही इरादा नव्हता किंवा कोणत्याही प्रकारे दहशत दाखवण्याचा इरादा नव्हता , त्यांनी केलेले कृत्य हे त्यांच्या गरजेपोटी केलेले आहे. त्या कृत्यामुळे प्रत्येक भारतीयासह , इंग्रज सरकार पर्यंत स्वातंत्र्याचं महत्व पोहचेल. परंतु ह्यांनी इंग्रज सरकार विरुद्ध घोषणाबाजी केली , अनधिकृत भारताचा झेंडा फडकावला आणि वंदे मातरम च्या घोषणा दिल्या ज्या सरकारच्या दृष्टीने गुन्ह्यास पात्र ठरवणारी आहेत " ह्या स्टेटमेंट मुळे दादांची शिक्षा सश्रम वरून साध्या तुरुंगवासाची करण्यात आली. पुढे दादांना पुणे, विजापूर आणि शेवटी परत सातारा या ठिकाणी आणण्यात आले. अशी एकूण साधारण अडीच वर्ष त्यांनी शिक्षा भोगली. दादा जोपर्यंत जेल मध्ये होते तोपर्यंत त्या धक्याने दादांच्या दोन्ही मावशांचे (ज्यांनी दादांना सांभाळले ) निधन झाले. लहान मुले यांचा संसार आणि जबाबदारी दादांच्या पत्नी ताराबाई पांडुरंग साळुंखे यांनी सांभाळली. पुढे दादांनी सुटका झाल्यावर सुद्धा वेळोवेळी स्वातंत्र्य लढ्याच्या कार्यक्रमात भाग घेतला. दादांना एकूण ३ मुलगे आणि ४ मुली . पुढे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडून दादांना पेन्शन देण्यात आली वेळोवेळी स्वातंत्र्य लढ्यातील सहभागासाठी वेगवेगळी बक्षीशे , शाबासकी , आणि सत्कार करण्यात आले यामध्ये ताम्र पत्र , मानपत्र , सन्मान चिन्ह , वेगवेगळ्या संस्थांचे पुरस्कार असे बरेच काही मिळत गेले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे काळात त्यांना ताम्रपात्र देऊन त्यांचा सन्मान केला. पुढे माजी मुख्यमंत्री ए. आर अंतुले आणि विलासराव देशमुख यांच्या काळात मुंबई आणि सातारा याठिकाणी त्यांचा गाऊराव करण्यात आला. 

दादांचे निधन २० मे २००७ रोजी मालदन गावी रहात्या घरी झाले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दादांची स्वातंत्र्यलढ्यातील माहितीची दाखल विकिपीडिया ने सुद्धा घेतली आणि आज हि त्यांची माहिती गूगल वर सुद्धा उपलब्ध आहे.

आज ह्यांच्यासारख्या अनेक वीर क्रांतिकारक विस्मृतीत गेले आहे. येणाऱ्या पिढीला ह्यांच्याबद्दल माहिती असंण काळाची गरज आहे.