छत्रपती शिवाजी महाराज व स्व.यशवंतराव चव्हाण यांना मंत्री शंभूराज देसाई यांनी केले अभिवादन


सातारा दि. 13 : मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई हे पहिल्यांदाच आज साताऱ्यात आले. यावेळी त्यांनी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालुन अभिवादन केले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.