स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने प्रभात फेरीच्या माध्यमातून जनजागृती रॅलीचे आयोजन


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
तळमावले येथील काकासाहेब चव्हाण कॉलेज या ठिकाणी शासनाच्या व शिवाजी विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने "घरोघरी तिरंगा अभियान" व "स्वराज्य अभियान " अंतर्गत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरूण गाडे यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सामुहिक राष्ट्रगीताचे व प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रभात फेरीच्या माध्यमातून "घरोघरी तिरंगा अभियान" व "स्वराज्य अभियानविषयी " जनजागृती करण्यात आली. या प्रभातफेरीत महाविद्यालयातील ज्युनियर व सिनियर विभागातील विद्यार्थी -विद्यार्थिनी, गुरुदेव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. महेश चव्हाण , प्रा. संभाजी नाईक, प्रा. लक्ष्मण दोडमणी , प्रा. सी. जी. पुटवाड, प्रा. सचिन पुजारी आदींनी केले. प्रभात फेरीला महाविद्यालयातील सर्वच गुरूदेव कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts
तळमावले येथील वाल्मिकी विद्यामंदिरात २५ वर्षानंतर भरला पुन्हा दहावीचा वर्ग
इमेज
येळगाव येथे मोफत त्वचा रोग निदान व औषधोपचार शिबीर संपन्न.
इमेज
जनविकास पतसंस्थेच्या आगाशिवनगर शाखेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
इमेज
सातारा जिल्ह्यातील संवादाचे जाळे अधिक मजबूत होणार : खा. श्रीनिवास पाटील
इमेज
जोपर्यंत माथाडी कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहिल: नरेंद्र अण्णासाहेब पाटील
इमेज