काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले येथे वरिष्ठ विभागात नवीन विज्ञान विद्याशाखा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची मान्यता

  तळमावले -कृष्णाकाठ वृत्तसेवा:  

तळमावले येथील काकासाहेब चव्हाण कॉलेज   येथे वरिष्ठ विभागात नवीन विज्ञान विद्याशाखा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त झाली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूण गाडे यांनी दिली. वांग खोऱ्यातील ग्रामीण, दुर्गम, भूकंपप्रवण भागातील गोरगरीब विद्यार्थी -विद्यार्थिनींना विज्ञान शाखेतून उच्च शिक्षण मिळावे, यासाठी वरिष्ठ विभागात विज्ञान शाखा सुरू करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ, विद्यार्थी -विद्यार्थिनीं व पालक यांच्याकडून सातत्याने होत होती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि महाराष्ट्र शासन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून नवीन विज्ञान विद्याशाखा सुरु करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ज्या विद्यार्थी -विद्यार्थिनींना बी. एस्सी. भाग १ या वर्गात प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांनी तात्काळ महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. अरूण गाडे यांनी केले आहे.

Popular posts
तळमावले येथील वाल्मिकी विद्यामंदिरात २५ वर्षानंतर भरला पुन्हा दहावीचा वर्ग
इमेज
येळगाव येथे मोफत त्वचा रोग निदान व औषधोपचार शिबीर संपन्न.
इमेज
जनविकास पतसंस्थेच्या आगाशिवनगर शाखेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
इमेज
सातारा जिल्ह्यातील संवादाचे जाळे अधिक मजबूत होणार : खा. श्रीनिवास पाटील
इमेज
जोपर्यंत माथाडी कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहिल: नरेंद्र अण्णासाहेब पाटील
इमेज