सचिन आचरेंच्या हाती शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश.

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
पाटण तालुक्यातील काळगांव गावचे सुपुत्र व मनसे नवी मुंबई शहर सचिव सचिन भाऊ आचरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत. आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यां समवेत शिवसेनेत प्रवेश केला.

या वेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सचिन आचरे यांना शिवबंधन बांधण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील, सातारा जिल्हा प्रमुख हर्षद भाऊ कदम, युवासेना सह सचिव करण दादा मढवी, तसेच युवासेना उप शहर अधिकारी कोपरखैरणे विजय मोरे आणि शिवसैनिक उपस्थित होते. 

या पूर्वी सचिन आचरे यांनी काही काळ शिवसेना पाटण तालुका प्रमुख पदाची जबाबदारी ही सांभाळली होती.