तळमावले येथील मर्चंट सिंडिकेट संस्थेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
ध्वजारोहण करताना संस्थेचे व्हा.चेअरमन श्री.सर्जेराव नलवडे या वेळी उपस्थित संस्थापक/अध्यक्ष श्री.अनिल शिंदे व इतर मान्यवर.
तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
तळमावले येथील मर्चंट सिंडिकेट संस्थेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेचे व्हा.चेअरमन श्री.सर्जेराव नलवडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या वेळी संस्थापक/अध्यक्ष श्री.अनिल शिंदे, चेअरमन श्री.ज्ञानदेव जाधव (नाना) यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

 यावेळी संस्थेचे संचालक शिवराम पवार(मामा), डॉ.चंद्रकांत बोत्रे, सुरेश देसाई, शिवाजी देसाई, जितेंद्र कोळेकर,सल्लागार डॉ. सुभाष ताईगडे, अधिकराव पाटील, शंकर जाधव, ओमकार शिंदे तसेच बाळासाहेब कचरे,आनंद माने(शेठ), सौ.कविताताई कचरे,सतीश कचरे,उमेश काळे,हणमंत ताईगडे,उत्तम ताईगडे इतर मान्यवर व संस्थेचे सर्व कर्मचारी, सेवक व हितचिंतक उपस्थित होते.