15 ऑगस्ट रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार.
सातारा| कृष्णाकाठ वृत्तसेवा :
भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 75 वा वर्धापन दिनानिमित्त सोमवार दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. तरी नागरिकांनी ध्वजारोहण कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी केले आहे.

   मुख्य शासकीय समारंभात नागरिकांनी सहभाग घ्यावा यासाठी दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.35 ते 9.35 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा व इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ करण्यात येऊ नये. तथापि, इतर शासकीय कार्यालयात अथवा संस्थेचा त्या दिवशी ध्वजारोहण समारंभ करावयाचा असेल तर तो त्या दिवशी सकाळी 8.35 वा. पूर्वी किंवा 9.35 वा. नंतर करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.