12 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण ग्रामपंचायत कर भरणाऱ्यांना तिरंगा मोफत ; मंद्रुळकोळे ग्रामपंचायतीचा निर्णय.
ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
मंद्रूळकोळे ता.पाटण ग्रामपंचायतीच्या वतीने सतत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात त्यामुळे ग्रामपंचायत कारभारा बाबत ग्रामस्थ समाधानी आहेत. आता चालू वर्षाची ( 2022/23 ) घरपट्टी पाणीपट्टी वगैरे कर जे खातेदार 12 ऑगस्ट 2022 पर्यंत भरतील त्यांना त्यांना ग्रामपंचायतीकडून मोफत तिरंगा झेंडा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सरपंच अमोल पाटील यांनी दिली
   याबात सरपंच अमोल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाचे विविध उपक्रम व योजना सर्वसामान्य लोकापर्यंत पोहचवण्याचे काम ग्राम पंचायतीच्या माध्यमातून केले जाते लोकांच्या अडीअडचणी जागेवरच सोडवण्याचे काम केले जाते. चार वर्षाच्या कालावधीत सर्वांना बरोबर घेवून गावच्या विकासाचा कारभार सुरु आहे. 
               ग्रामपंचायतीच्या माध्यमात सार्वजनिक स्वच्छता, वांगनदीची स्वच्छता,गावात ओला सुका कचरा संकलनासाठी घंटागाडी, मुलीच्या जन्माचे स्वागत 5000 रुपयाची ठेव पावती देवून करण्याचा निर्णय,भटक्या विमुक्त समाजातील कुटुंंबाना कायम स्वरुपी घरे,गावात आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, पशुवैद्यकीय शिबीर, विधवा प्रथा बंदीचा निर्णय, घरकचरा सांडपाणी व्यवस्थापन असे अनेक उपक्रम राबवले आहेत.
_________________________________
आमचे मार्गदर्शक हिंदुराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना बरोबर घेवून काम करत आहे ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र विस्तारित असले तरी सर्वांगीण विकासाचे कामे केली जातात आणि आणखी जास्तीत जास्त विकासनिधी आणण्यासाठी 
प्रयत्न करून विकास साधणार
- सरपंच अमोल पाटील 
________________________________
Popular posts
चक्क सुपारीवर साकारलं श्रीमहालक्ष्मीचं चित्र.
इमेज
मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून जलजिवन मिशन योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील 101 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 29 कोटी 30 लक्ष रुपयांचा निधी मंजूर.
इमेज
कराड जनता बँकेच्या 8 संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. न्यायालयाचा कराड बँकेच्या संचालकांना दणका
इमेज
काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचा झेप नियतकालिक अंक वेधक व प्रेरणादायक : संजय देसाई
इमेज
तळमावले बिट मध्ये, पोषण माह अभियान अंतर्गत सदृढ बालक बालिका स्पर्धा उत्साहात संपन्न.
इमेज