सातारा जिल्ह्यातील पहिले काव्य संमेलन घोगाव ता कराड येथे उत्साहात संपन्न.

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : सातारा जिल्ह्याला साहित्यीकांचा वारसा असुन घोगाव येथे भरविण्यात आलेला काव्यसंमेलनातुन तो पुढे जतन केला जावा हा उपक्रम प्रेरणादायी व कौतुकास्फद असाच आहे असे गौरवोदगार- राष्ट्रवादी आय टी सेल प्रमुख सारंग पाटील यांनी केले. 

घोगाव ता.कराड जिल्हा सातारा येथे धगधगती मुंबई व मुक्त छंद वृत्तपत्राच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या काव्यसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते.यावेळी धगधगती मुंबईचे संपादक-भिमराव धुळप,गझलकार-गजानन तुपे,चित्रकार - संदिप डाकवे,ह.भ.प- संजय भावके,मारुतराव खंडागळे(गुरुजी),फौजी-हिंदुराव साळुंखे,पत्रकार नथुराम कुंभार,समाजसेवक एकनाथ तांबवेकर, नारायण साळुंखे,ग्रामपंचायत सदस्या सौ रेखा अरुण साळुंखे यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.

सातारा जिल्ह्यातील या पहिल्या काव्य संमेलनाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन व प्रतिमापुजन करून करण्यात आली. काव्यसंमेलन दोन सत्रात घेतले होते.पहिले सत्र श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांना समर्पित केले.तर दुसरे सत्र कवी वसंत बापट यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांना समर्पित केले. या कार्यक्रमाला सातारा-सांगली जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून अनेक नामांकित कविसह नवोदित कवींनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बोलताना श्री.सारंग पाटिल पुढे म्हणाले की,दर्जेदार साहीत्य निर्माण करण्याची ताकद शब्दांमध्ये आहे. मराठी मातीशी असणारी नाळ जोडण्याचे काम कविता (कवी) करत असतो.

यावेळी दुसरे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध चित्रकार,पत्रकार डाॅ.संदिप डाकवे म्हणाले, की ग्रामीण भागातील कविंना,साहित्यिकांनी आपल्या आजुबाजुचे ग्रामीण जीवन आपल्या साहीत्यात मांडले तर कसदार कविता जन्माला येते तसेच घोगाव येथील काव्यसंमेलनातुन अनेक नवोदीतांना व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे या कवी संमेलनाची दखल नक्कीच घेण्यासारखी आहे.सातारा जिल्ह्यात अनेक कवी जन्माला आले आहेत. त्यांचा वारसा पुढे अशा संमेलनाच्या माध्यमातून पुढे चालला पाहिजे त्याची सुरुवात घोगाव नगरीतून झाली आहे. यावेळी भिमराव धुळप,गजानन तुपे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे संपूर्ण प्रायोजन शिवराष्ट्र मेडिकल अँड नर्सिंग कॉलेज चे संस्थापक ह भ प संजय भावके यांनी केले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्त सोळाकुरे यांनी केले