कुंभारगाव प्राथमिक केंद्र शाळेच्या चिमुकल्यांचा दिंडीतून' विठूचा गजर.

तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

कुंभारगाव तालुका पाटण येथील जि. परिषद केंद्र शाळेच्या चिमुकल्यानी विठ्ठल रखुमाई ची वेषभूषा साकारत तर अन्य चिमुकल्यांनी वारकरी पोशाख परिधान करुन भक्तिमय वातावरणात हातात भगवे झेंडे घेत प्रती पालखी दिंडीचा आनंद लुटला. अवघ्या महाराष्ट्रातून वारकरी पंढरपूरकडे संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम इतर विविध संतांच्या दिंडीच्या सोबत पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात या सोहळ्यात लहानापासून जेष्ठापर्यंत सर्वजन मोठ्या भक्ती भावाने सहभागी होतात या भक्ती सोहळ्यात प्राथमिक केंद्र शाळेचे चिमुकले विद्यार्थी मागे नाहीत त्यांनी आपली शाळाच पंढरपूर समजून माऊलीची प्रती पालखी तयार करून आषाढी वारीचेअवचित्य साधून प्राथमिक केंद्र शाळेतून कुंभारगातून प्रदिक्षणा काढत ज्ञानोबा माऊली तुकाराम गजरात टाळ, मृदंग हाती झेंडे, डोक्यावर तुळशी वृंदावन घेत कुंभारगांव परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला. यावेळी सर्व चिमुकले विद्यार्थी वारकऱ्यांचा वेषात दिडींत सहभागी होते. हा सर्व दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका चव्हाण मॅडम, शिक्षिका माधुरी कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले. 

Popular posts
मोरेवाडी ता पाटण येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिर जीर्णोद्धार व 15 व्या वर्धापन वर्षारंभ निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन.
इमेज
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
पाटण तालुक्यातील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
इमेज
मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदी घोणशीची ऐश्वर्या गुरवची निवड.खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सत्कार.
इमेज