घोगाव| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
मुक्तछंद साहित्य समूह आणि सा. धगधगती मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने घोगाव तालुका कराड येथे जिल्हास्तरीय कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
संपूर्ण सातारा जिल्ह्यातील कविना हे कविसंमेलन निशुल्क आहे. हिरवाईने बहरलेल्या निसर्गरम्य वातावरणात रविवार, २४ जुलै २०२२ रोजी हे कवी संमेलन संपन्न होणार आहे.
घोगाव येथील शिवराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड नर्सिंग सायन्सेस महाविद्यालयाच्या प्रांगणात या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २४ जुलै रोजी सकाळी दहा ते दुपारी साडेचार या कालावधीत सातारा जिल्ह्यातील कवी आणि कवयित्रींच्या स्वरचित बहारदार काव्यरचना या ठिकाणी सादर करण्यात येणार आहेत. कार्यक्रमासाठी नामवंत चित्रकार आणि पत्रकार संदीप डाकवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील कवी आणि कवयित्री यांना या कवी संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हे कवीसंमेलन फक्त सातारा जिल्ह्यातील कवी आणि कवयित्री यांच्यासाठी मर्यादित आहे.
यामध्ये सहभागी होण्यासाठी सातारा जिल्ह्यातील इच्छुक कवी आणि कवयित्री यांनी आपल्या सादरीकरणाच्या दोन कविता 96992 46358 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवायच्या आहेत. सहभागी झालेल्या सर्व कवी आणि कवयित्री यांना संमेलनात मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल. तसेच उपस्थितांमधून बहारदार आणि लक्षवेधी काव्य सादरीकरण करणाऱ्या पाच कवी/कवयित्रींचा विशेष मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात येईल. सहभागी होणाऱ्या इच्छुक कवी आणि कवयित्रींनी अधिक माहितीसाठी वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा.