धामणी ता.पाटण येथील माजी सरपंच बाजीराव सावंत (नाना) यांनी वाढदिवसानिमित्त जोपासली सामाजिक बांधिलकी


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
आपण ज्या समाजात राहातो त्या समाजाप्रती आपल्या जबाबदारीचे भान ठेवत धामणी येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच बाजीराव सावंत यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवारी रक्तदान शिबीर आणि वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला. गावातील युवकांनी व ग्रामस्थ यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

    भविष्यातील पिढीला निरोगी आयुष्य प्रदान करणे आपले कर्तव्य आहे. यासाठी पर्यावरण समृद्धीची गुंतवणूक मोलाची आहे. या उद्देशातून बाजीराव सावंत यांनी गावातील गगनगिरी महाराज मठ परिसरात झाडांचे रोपण केले. या उपक्रमामुळे गाव परिसरात हिरवळ प्राप्त झाली आहे.

     तसेच या परिसरात cctv बसवण्यात आले आहेत. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई , ढेबेवाडी वनपाल अधिकारी सुभाष राऊत , सागर शिंदे , पत्रकार राजेश पाटील , धनाजी सावंत , विकास पवार, बबन सावंत, रमेश सवादेकर, अशोक मोरे, बाळासाहेब जाधव ,बाळासाहेब पवार, रमेश नाचनकर, आनंदा नायकवडी, प्रकाश महाजन, तानाजी लोकरे, आबासो पाटील, आबासो दिंडे, गोरख सवादेकर आदी मान्यवर उपस्थित होते.