श्री संतकृपा डी फार्मसी महाविद्यालयात ऑनलाईन वेबिनार संपन्न.

घोगाव |कृष्णाकाठ वृत्तसेवा:

घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) येथे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे शास्त्रज्ञ डॉ. पंकज पोतदार यांचे नुकतेच ऑनलाईन वेबिणार संपन्न झाले. त्यांनी एक्सप्लोरिंग द इंटरफेस बिटविन ड्रग डेव्हलोपमेंट बायो इमॅजिंग अँड ड्रग डिलिव्हरी या विषयावरती मार्गदर्शन केले. 

यावेळी प्राचार्य डॉ. पंकज पोतदार यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले.

यावेळी डॉ. पोतदार यांनी विविध प्रकारच्या औषधांचे संशोधन कसे केले जाते, ते कसे शोधले जाते त्यासाठीच्या विविध प्रक्रिया, प्रकल्प हे राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये कशा प्रकारे पार पडतात त्यासाठी लागणारी उपकरणे याविषयी माहिती दिली.

या कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रा. दिप्ती पाटील यांनी मानले.