संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला सातारा प्रशासनाने दिला निरोप


सातारा, दि. 4 : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी 28 जून ते 4 जुलै दरम्यान लोणंद, तरडगाव, फलटण व बरड येथे मुक्काम करुन कारुंडे जि. सोलापूर येथून पालखी सातारा जिल्हा प्रशासनाकडून सोलापूर जिल्हा प्रशासनाकडे हस्तांतरीत करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.सातारा जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्याकडे आज कारुंडे जि. सोलापूर येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी हस्तांतरीत करण्यात आली. यावेळी सोलापूरचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सोलापूरचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते उपस्थित होते.  

Popular posts
मोरेवाडी ता पाटण येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिर जीर्णोद्धार व 15 व्या वर्धापन वर्षारंभ निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन.
इमेज
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
पाटण तालुक्यातील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
इमेज
मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदी घोणशीची ऐश्वर्या गुरवची निवड.खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सत्कार.
इमेज