विशेष कार्यकारी अधिकारीपदी पत्रकार शंकर कडव यांची नियुक्ती


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा:  मुंबईतील चेंबूरच्या घाटले गाव परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार शंकर कडव यांची नुकतीच महाराष्ट्र शासनाने एसईओ अर्थात विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे.पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हे शासनाचे सेवाभावीपद प्रदान करण्यात आले आहे. 

कराड तालुक्यातील बामणवाडी येथील मूळ रहिवाशी असलेले शंकर कडव हे गेली ३७ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात पूर्णवेळ काम करत असून ते सध्या चेंबूरमधील घाटले गाव परिसरात राहतात. त्यांचा विविध सामाजिक कार्यात सहभाग राहिला आहे.त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र मिळाले असून त्यांच्या या विशेष कार्यकारी अधिकारीपदाच्या नियुक्तीबद्दल चेंबूरमधील पत्रकारिता क्षेत्र,विविध सामाजिक संस्था,संघटना आणि राजकिय क्षेत्रासह सर्वसामान्य नागरिक त्यांचे अभिनंदन करत आहेत.