सिताई व प्राना फाऊंडेशनच्या वतीने स. पो. नि संतोष पवार यांचा गौरव.


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील करपेवाडी येथील बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या भाग्यश्री संतोष माने हिचा २२ जानेवारी २०१९ रोजी अज्ञाताने गळा चिरून अतिशय क्रूरपणे खून केला होता.

तीन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेचा ढेबेवाडी पोलिसांनी छडा लावला. व या गुन्ह्यातील सर्व आरोपीना ही अटक केली आहे. यासाठी स.पो.नि संतोष पवार यांनी विशेष प्रयत्न केले. या निमित्त सिताई फाउंडेशन व प्राना फाऊंडेशन तर्फे संतोष पवार यांचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी विशेष तपास अधिकारी चौखंडे व स.पो.नि संतोष पवार यांच्याशी सिताई फाउंडेशनच्या प्रमुख कविता कचरे यांनी सविस्तर चर्चा केली. तसेच ढेबेवाडी विभागातील काही तांत्रिक-मांत्रिक , देबॠषी यांचीही कसून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी या वेळी केली व भाग्यश्री माने हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर कारवाई करण्यासाठी मागणीचे निवेदन सिताई व प्राना फाऊंडेशन च्या वतीने देण्यात आले.

यावेळी कविता कचरे, सुवर्णा जानुगडे, स्वरांजली कचरे, कमलाकर पाटील व सिताई व प्राना फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Popular posts
मोरेवाडी ता पाटण येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिर जीर्णोद्धार व 15 व्या वर्धापन वर्षारंभ निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन.
इमेज
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
पाटण तालुक्यातील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
इमेज
मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदी घोणशीची ऐश्वर्या गुरवची निवड.खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सत्कार.
इमेज