श्री संतकृपा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी बनवली इलेक्ट्रिक हॅंडीकॅप ट्रायसिकल.


घोगाव| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा इंजिनिअरिंग कॉलेजच्या मेकॅनिकल विभागातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक हॅंडीकॅप ट्रायसिकल बनवली आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील अंतिम वर्षात शिकणाऱ्या अक्षय भाष्टे, समीर कदम, गणेश पवार, अनुरोध मोरे , शितल सुतार, मुस्तकीम नायकवडी या विद्यार्थ्यांनी समीर कदम या विद्यार्थ्याच्या अपंग असणाऱ्या बहीनीला होणाऱ्या त्रासाची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी तिच्यासाठी 'इलेक्ट्रीक ट्रायसीकल बनवायचे ठरवले. त्यांनी तीचीच जुनी साधी अपंग सायकल मॉडीफाय करून त्यामध्ये इलेक्ट्रीक उपकरणांचा वापर करून इलेक्टीक चार्जवर तसेच हँडलवर सुद्धा चालु शकणारी "इलेक्ट्रीक हँडीकॅप ट्रायसीक्ल" बनवली. 

ही सायकल एका चार्ज मध्ये40-50 km पर्यंत अंतर कव्हर करू शकते ही सायकल एका चार्ज मध्ये पर्यंत अंतर कव्हर करू शकते. यावर एक व्यक्ती त्याचे काही साहित्य घेऊन तो प्रवास करू शकलो. या सायकलचे वैशिष्ट्ये म्हणजे या हॅंडीकॅप सायकलची बॅटरी संपल्यास हीच सायकल हाताने चालवू शकतो. सदर बॅटरीला चार्ज करण्यासाठी साधारणतः दिड ते दोन तास लागतात. 

अशी ही भविष्यातील अपंग व्यक्तींसाठी सोयीस्कर ठरणारी सायकल या विद्यार्थ्यांनी बनवली आहे. ही सायकल अत्यंत कमी खर्चामधे या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातच बनवली आहे. या करीता त्यांना त्यांचे प्रोजेक्ट गाईड अमीत जगदाळे , विभागप्रमुख भरतराज भोसले व मेकॅनिकल विभागातील सर्व स्टाफचे सहकार्य लाभले. 

ही इलेक्ट्रिक हॅंडीकॅप सायकल बनवणाऱ्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकणी तसेच संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव श्री प्रसून जोहरी, संस्थेच्या संचालिका सौ. प्राजक्ता जोहरी यांनी अभिनंदन केले.