आनंदराव चव्हाण पतसंस्थेस आदर्श पतसंस्था पुरस्कार


सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचे हस्ते पुरस्कार स्वीकारताना चेअरमन अभिजित पाटील, आर. बी. पाटील व इतर.

ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
सातारा जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि सातारा जनता सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातारा जिल्ह्यातील पतसंस्थांसाठी आयोजित चर्चासत्रात मंदुळकोळे ता. पाटण येथील आनंदराव चव्हाण पतसंस्थेला आदर्श सहकारी पतसंस्था पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या हस्ते सातारा येथे झालेल्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले यावेळी सातारा सहकारी बँकेचे संचालक आमदार शिवेंद्रराजे भोसले, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या उपस्थितीत आनंदराव चव्हाण पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष आर.बी.पाटील, संचालक सदाशिव कदम, व्यवस्थापक सुहासचंद्र पाटील, शाखाप्रमुख रुपेश भोई आदींची उपस्थिती होती.

अभिजित पाटील म्हणाले, आनंदराव चव्हाण पतसंस्थेने उत्तम ग्राहक सेवेबरोबरच पारदर्शक कारभारा द्वारे जिल्ह्यात आपल्या कार्याचा ठसा उमटवून प्रगतीचा आलेख सतत चढता ठेवला आहे.