आ.शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण.


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
पाटण तालुक्याचे विद्यमान आमदार व माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

कोरोनाची लागण झालेली असली तरी प्रकृती ठणठणीत असुन काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे.अशी माहिती स्वतः शंभूराज देसाई यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. 

आ. शंभूराज देसाई हे मुंबई येथील सुरुची या शासकीय निवासस्थानी सध्या गृह विलगीकरण कक्षात असल्याचे सांगितले आहे. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असली, तरी कोणतेही घाबरण्याचे कारण नाही. 
तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चार ते पाच दिवस विश्रांती घेण्यात येणार असल्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. 

 पाटण मतदार संघात शिंदे गटाची व आपली भूमिका मांडल्यानंतर शंभूराज देसाई हे मुंबईत दाखल झाले होते.