डाॅ.संदीप डाकवेंच्या कलाकृतींचे इलेक्ट्राॅनिक्स मिडीयाकडून प्रसारण


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर गेली काही वर्षापासून मोरपिसावर संत तुकाराम, घराच्या भिंतीवर वारीचे चित्र, वारीचे शुभेच्छा पोस्टर, एका पानावर हरिपाठ, शब्दातून विठूरायाची विविध रुपे असे कलात्मक उपक्रम पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील अक्षर वारकरी डाॅ.संदीप डाकवे यांनी राबवले आहेत. यांची दखल इलेक्ट्राॅनिक्स मिडीयाने घेवून त्यांचे थेट प्रसारण केले आहे.

कॅलिग्राफीच्या माध्यमातून रेखाटलेल्या विठूरायांच्या विविध चित्रांची भुरळ वृत्तवाहिनींच्या प्रतिनिधींना पडली. न्यूज 18 लोकमतचे विशाल परदेशी, किरण मोहिते, स्वप्नील घाग यांनी गुरुवार दि.7 जुलै व शुक्रवार दि. 8 जुलै, 2022 रोजी ‘भेटी लागी जीवा’ या कार्यक्रमात, एबीपी माझा चे प्रतिनिधी राहुल तपासे, आप्पासाहेब मोहरकर यांनी रविवार दि.3 जुलै, 2022 रोजी ‘माझा विठ्ठल माझी वारी’ या कार्यक्रमात, लोकशाही चॅनेलचे प्रतिनिधी प्रशांत जगताप यांनी मंगळवार दि.28 जून, रविवार दि. 3 जुलै, बुधवार दि.6 जुलै, 2022 रोजी ‘वारी लोकशाही संगे’ या कार्यक्रमात तसेच ‘झी टाॅकीज’ ने फेसबुक पेजवर हे चित्र सोमवार दि.4 जुलै, 2022 रोजी शेअर केलेे. यासाठी प्रशांत अनासपुरे, विशाल सवणे, स्वाती यांचे विशेष सहकार्य लाभले. विशेष कार्यक्रम व दैनंदिन वार्तापत्रात संदीपने साकारलेल्या विठ्ठल कलाकृती दाखवत त्यांच्याशी दिलखुलास संवाद ही साधला. त्यामुळे सर्जनशील मनाचे युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांची कला संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे.

याशिवाय शुक्रवार दि.8 जुलै, 2022 रोजीच्या वाखरी येथील उभ्या अश्व अशा रिंगणाच्या नेत्रदीपक सोहळयानंतर न्यूज 18 लोकमत चे प्रतिनिधी वैभव सोनवणे, विरेंद्र उत्पात, कॅमेरामन सचिन कदम व अन्य सहकारी यांनी डाॅ.संदीप डाकवे यांच्याशी संवाद साधला तो लाईव्ह स्वरुपात प्रसारित करण्यात आला. माऊलींच्या कृपेमुळे हे आनंददायी क्षण अनुभवता आल्याची भावना डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केली आहे. इलेक्ट्रॉनिक मिडीयामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर डाॅ. डाकवे यांची कला पोहोचली आहे. डाॅ.संदीप डाकवे यांनी सर्व इलेक्ट्राॅनिक मिडीया प्रतिनिधी, कार्यालयीन टीम व अन्य सहकारी यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. डाकेवाडीसारखया दुर्गम भागातील कलावंत एकाचवेळी अनेक इलेक्ट्राॅनिक मिडीयावर पोहोचल्यामुळे सर्व स्तरांतून डाॅ.संदीप डाकवे यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे.