श्री संतकृपा डिप्लोमा इंजिनिअरिंग महाविद्यालयास AICTE नवी दिल्लीची मान्यता.


घोगाव| कृष्णाकाठ वृत्तसेवा :

घोगाव तालुका कराड जिल्हा सातारा येथील श्री संतकृपा शिक्षण संस्था संचलित श्री संतकृपा डिप्लोमा इंजिनिअरिंग महाविद्यालयास नुकतीच अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्लीची मान्यता प्राप्त झाली आहे.

इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा इंजिनिअर होण्याची सुवर्णसंधी या श्री संतकृपा डिप्लोमा इंजिनिअरिंग च्या मान्यतेने कराड, पाटण, शिराळा या तालुक्यातील असंख्य विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना श्री संतकृपा शिक्षण संस्थेने एक नवीन दालन विद्यार्थ्यांच्या गावाजवळच उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे या तीन तालुक्यातील विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ज्या अभ्यासक्रमांना हमखास नोकरीची संधी प्राप्त आहे व सध्याच्या युगात जे कोर्स ॲडव्हान्स कोर्स म्हणून ओळखले जात आहेत त्याच कोर्सची निवड या डिप्लोमा महाविद्यालयाने केली आहे त्यामध्ये 

1) Artificial intelligence and machine Learning.

2) Mechatronics

3) Civil and Environmental Engineering.

प्रत्येकी 60 विद्यार्थी क्षमता असलेले हे कोर्स असून इंजिनिअरिंग मधील हे ॲडव्हान्स कोर्स आहेत या कोर्सेसना 100% नोकरीची संधी प्राप्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी व त्यांच्या स्वप्नांच्या उंच भरारीसाठी आजच आपण श्री संतकृपा डिप्लोमा इंजिनिअरिंग ची निवड करा असे आवाहन श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव श्री.प्रसून जोहरी व श्री संतकृपा इंजिनिअरिंग (बी टेक) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी केले आहे.

.