महिला हि कुटुंबाचा कणा असते तिचे आरोग्य उत्तम असायला हवे:डॉ.वर्षा देशपांडे


घोगाव| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

महिला हि कुटुंबाचा कणा असते तिचे आरोग्य उत्तम असायला हवे.बदलती जीवनशैली त्यामुळे होणारे आजार यावर नियंत्रण करण्यासाठी सर्वांनी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार करणे काळाची गरज आहे. तरच आपण निरोगी जीवन जगू शकतो असे प्रतिपादन डॉ. वर्षा देशपांडे यांनी व्यक्त केले.

घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा इंजिनिअरिंग (बी टेक) या महाविद्यालयात आयोजित Anti-Sexual Harassment Committee अंतर्गत "Women's Health Awareness Program"या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. वर्षा देशपांडे विद्यार्थीनीना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. 

यावेळी पुढे मार्गदर्शन करताना त्यांनी PCOS होण्याची कारणे आणि त्यावर उपचार याबद्दल मार्गदर्शन केले. महिला मध्ये होणारे Cancer त्यावरील उपचार याचे मार्गदर्शन केले. महिला हि कुटुंबाचा कणा असते तिचे आरोग्य उत्तम असायला हवे.बदलती जीवनशैली त्यामुळे होणारे आजार यावर नियंत्रण करण्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार करणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या आधुनिक उपचार पद्धती बाबत सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राधा गोसावी यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. तर सर्व उपस्थित मान्यवर व विद्यार्थी यांचे तेजश्री तिकूडवे यांनी आभार मानले.