वा..वा..वा...प्रत्यक्षात भेटू त्यावेळी काढू फोटो... प्रवीणजी तरडे यांनी दिली स्वतःच्या चित्राला दाद



तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

पिवळ्या रंगाच्या कार्डशीट पेपरवर तेलखडूनी रेखाटलेले स्वतःचेच चित्र पाहून खुष झालेल्या सुप्रसिध्द अभिनेते आणि दिग्दर्षक प्रवीण तरडे यांनी व्हाईस मेसेज पाठवून डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेला उत्स्फूर्त दाद दिली. सासवड ता.पुंरदर येथे आचार्य अत्रे यांच्या स्मृतीदिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास सुप्रसिध्द अभिनेेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे उपस्थित होते. या कार्यक्रमात सुप्रसिध्द साहित्यिक प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे यांनी डाॅ.डाकवे यांनी सरसेनापती हंबीरराव या चित्रपटातील तरडे यांचे रेखाटलेले चित्र मोबाईलमधून दाखवले. त्यावेळी तरडे यांनी डाकवे यांच्या कलेचे कौतुक करत डाॅ.यशवंत पाटणे यांच्या मोबाईलवर व्हाईस मेसेज पाठवत आपला अभिप्राय कळवला. ‘‘वा....वा.....वा..त्यांना पण माझा नमस्कार सांगा, प्रत्यक्षात कधीतरी भेटू....त्यावेळी काढू फोटो, तिकडे आलो आणि भेट झाली तर काढू फोटो...येस..धन्यवाद...धन्यवाद सर...!’’ अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया पाठवली आहे.

जास्तीत जास्त मान्यवरांना त्यांची चित्रे भेट देणे या डाॅ.डाकवे यांच्या छंदाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड मध्ये झाली आहे. मान्यवरांसोबत फोटो काढून तो शेअर करण्याची आवड असलेल्या डाॅ.डाकवे यांना या प्रतिक्रियेमुळे आंनद झाला आहे. अशा भेटीच्या फोटॊचे पुस्तक करण्याचा डॉ. डाकवे यांचा मानस आहे.

सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर, पावनखिंड अशा चित्रपटांमुळे प्रवीणजी तरडे सध्या सर्वत्र प्रसिध्दीच्या शिखरावर आहेत. कलेची जाण असलेले दिग्दर्शक प्रवीणजी यांनी केलेल्या कौतुकामुळे डाॅ.डाकवे भारावून गेले आहेत. कलेला कलावंतांकडून मिळालेली दाद खूप महत्त्वाची असते. गुरुवर्य प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे सर यांनी केलेल्या सहकार्यामुुळे मला त्यांच्यापर्यंत पोहोचता आले याबद्दल सरांचे मनापासून आभार..! अशा शब्दात चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.