बंडखोरांना इशारा ते राजीनाम्याची तयारी... उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे

मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 

मुंबई : शिवसेनेच्या राजकीय इतिहासात प्रथमच अभूतपूर्व संकट निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला संबोधित केले. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांना फेसबुक लाईव्हमधून उत्तर दिले आहे. या लाईव्हमध्ये उद्धव ठाकरेंनी राजीनामा, बंडखोरी अशा अनेक मुद्द्यांवर बोलले आहे. जाणून घ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे


मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार
माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहिती नाही. तुम्ही पळता कशाला? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की मी मुख्यमंत्री नको तर मी सोडायला तयार. आज मी वर्षावर मुक्काम हलवतोय. पण हे समोर येऊन बोला. 

हिंदुत्वाबद्द्ल बोलणारा विधानसभेत बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री
शिवसेना हिंदुत्वापासून दूर होऊ शकत नाही म्हणूनच आदित्य एकनाथ शिंदे अयोध्येला. हिंदुत्वावर बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री. शिवसेना आणि हिंदूत्व एकच, कधीही वेगवेगळे नाही. हिंदुत्व हा आमचा श्वास, अयोध्येला शिवसैनिक गेले. हिंदुत्वाबद्दल बोलणारा विधानसभेत बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे. 

शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नका
 शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नका. मला कोविड झालाय मी राजीनामा देतो तुम्ही येऊन घेऊन जा. हे काय मोठे आव्हान आहे. शिवसैनिक सोबत तोवर मी कुठल्याही आव्हानाला समोर जाईन. शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे. संकाटाला सामोरा जाणारा शिवसैनिक. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर माझी तयारी

माझ्यासाठी संख्या विषय गौण
आयुष्याची कमाई पद नाहीत. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. कुटुंब प्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले. ही माझी कमाई. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या विषय गौण. संख्या कशी जमवता हे नगण्य. मी आपला मानतो त्यांनी मला सांगाव मी मुख्यमंत्री पद सोडतो.

मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला तर मला आनंद
मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. परंतु मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला तर मला आनंद आहे. 

संध्याकाळी मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर
तुम्ही पळता कशाला? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की मी मुख्यमंत्री नको तर मी सोडायला तयार. आज मी वर्षावरून मुक्काम मातोश्रीवर हलवणार आहे.   

शस्त्रक्रियेमुळे भेटणे शक्य नव्हते
माध्यमात अनेक अफवा. मी भेटत नव्हतो. काही दिवस शक्य नव्हते. कारण शस्त्रक्रिया झाली. आता सुरुवात केली. पहिली कॅबिनेट रूग्णालयातून केली.

कोरोना काळात प्रामाणिकपणे केले
कोविड काळात लढाई लढलो. कठीण काळात कोणीही तोंड दिले नाही. अशा परिस्थितीत मला जे करायचे ते प्रश्न प्रामाणिकपणे केले. तेव्हा देशातील पहिल्या पाच मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून माझी निवड झाली.