अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद, शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
एकनाथ शिंदे यांची आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांना भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा असल्याचं भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. शिवाय एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ आजच घेणार असल्याचंही जाहीर केलं.याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील शिंदे यांचे अभिनंदन केलं आहे. शरद पवारांनी शिंदे यांचे अभिनंदन करणारे एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये पवारांनी म्हटलं आहे, 'राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो. स्व. यशवंतराव चव्हाण, श्री. बाबासाहेब भोसले, श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे. असं ट्विट शरद पवारांनी केलं आहे.

Popular posts
कुंभारगांव येथील संदीप देवळेकर यांचे दुःखद निधन .
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
इमेज
न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन.
मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत राज्यस्तरीय समितीने केली पाहणी.
इमेज