श्री संतकृपा इंजिनिअरिंग महाविद्यालयाने पक्ष्यांसाठी बनवलेली पक्षी भोजनालये स्तुत्य उपक्रम.

पाणी व अन्नाचा पक्षानी घेतला मनमुराद आस्वाद;एन एस एस कमिटीची कौतुकास्पद कामगिरी.घोगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्था संचलित श्री संतकृपा इंजिनिअरिंग बीटेक महाविद्यालयाच्या एन एस एस कमिटी मार्फत पत्र्यांच्या डब्याची पक्षी भोजनालय तयार केली व त्यामध्ये पक्ष्यांसाठी पाणी व अन्नधान्य, खाद्य ठेवता येईल अशी व्यवस्था केली. महाविद्यालयाच्या परिसरातही पक्षी भोजनालय झाडांना लावली आहेत. मे महिन्यातील कडक उन्हाळा व उन्हाळ्याची तीव्रता अधिक असल्याने पक्ष्यांचे अन्न व पाण्यासाठी खूप हाल होत आहेत याची जाणीव असल्याने एन एस एस कमिटी च्या वतीने महाविद्यालयाच्या वर्कशॉप मध्ये पक्षी भोजनालय तयार केली व तालुक्यातील ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालय यांना ती दिली. यामध्ये ग्रामपंचायत उंडाळे, स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर जुनियर कॉलेज उंडाळे, ओंड ग्रामपंचायत ओंड, शेवाळेवाडी ग्रामपंचायत शेवाळेवाडी, नांदगाव ग्रामपंचायत नांदगाव, कला, वाणिज्य, विज्ञान, जूनियर कॉलेज नांदगाव, कराड तहसीलदार ऑफिस कराड, कराड शहर पोलीस स्टेशन कराड, कराड ग्रामीण पोलीस स्टेशन कराड येथे वितरण करून झाडांना अडकवण्यात आली त्यामध्ये पाणी व अन्नधान्य ठेवण्यात येते पक्षी पाणी व अन्नधान्याचा मनसोक्त आस्वाद घेताना पाहून श्री संतकृपा इंजीनियरिंगने केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

     या करिता एन एस एस कमिटी सदस्य अमोल आवळकर, अजित पाटील, इंद्रजित देवकर, सुभाष थोरात, दादासो मस्कर, सुधीर गायकवाड, अमिता माने, योजना पाटील, सुवर्णा पाटील, देसाई मॅडम, तसेच एन एस एस कमिटी हेड अक्षय कुंभार व महाविद्यालयाच्या वर्कशॉप मधील स्टाफ विकास कुंभार, दत्तात्रय काळे, राहुल जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले व सदरची पक्षी भोजनालय तालुक्यातील विविध गावातील ग्रामपंचायत व विद्यालयात मोफत वाटप केली त्यामुळे पक्षांसाठी काम केल्याचे समाधान यातून सर्वांना मिळाले.

       सदर उपक्रमाचे संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, संचालिका प्राजक्ता जोहरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, संस्थेच्या विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व तालुक्यातील ग्रामस्थांनी कौतुक केले व एन, एस, एस कमिटीचे अभिनंदन केले.

____________________________________


____________________________________

फार्मसी महाविद्यालयाचे कर्मचारी अमोल कुंभार यांनी त्यांच्या परसबागेत सदरचे पक्षी भोजनालय झाडांना अडकवले होते. त्यामध्ये अन्नधान्य ठेवले असता पक्षांनी या पाणी व अन्नधान्याचा मनसोक्त आस्वाद घेतला यावेळी अमोल कुंभार यांनी आपल्या व्हिडिओ कॅमेऱ्यात टिपलेले हे क्षण. इंजिनीअरिंगचा हा उपक्रम सार्थ झाल्याचे समाधान सर्वांनी व्यक्त केले.