काळगांव येथील वि. का. सेवा सोसायटी चेअरमन पदी युवराज काळे तर व्हा. चेअरमन पदी किसन सावंत यांची बिनविरोध निवड.


तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

काळगांव येथील वि. का.स सेवा सोसायटी निवडणुकीत यशवंतराव चव्हाण शेतकरी सोसायटी बचाव पॅनेलने 13- 0 ने शिवशंभू ग्रामविकास पॅनेलचा दारुण पराभव केला होता. काळगांव ता पाटण येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची चेअरमन व्हा. चेअरमन पदाची निवडणूक नुकतीच पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी गीतांजली कुंभार यांचे अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली. 

यावेळी एकमताने चेअरमन पदी युवराज अनाम काळे तर व्हा. चेअरमन पदी किसन रामचंद्र सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

यावेळी नूतन संचालक युवराज अनाम काळे, सुनील रामचंद्र तेटमे , सुभाष महादेव पाटील, रघुनाथ शंकर बावडेकर, यशवंत एकनाथ येळवे, एकनाथ भिकाजी सावंत, किसन नामदेव सावंत, किसन रामचंद्र सावंत, विजय वामन काळे, वैशाली बाबासो पवार,शरद तातोबा जगताप, विलास गोविद नाईक, बाबुराव रामचंद्र पुजारी या संचालकांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी पॅनेल प्रमुख, मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

 पॅनेल प्रमुख व ग्रामस्थ यांचे वतीने नवनिर्वाचित चेअरमन, व्हा. चेअरमन यांचे अभिनंदन करण्यात आले.