स्पंदन’ ची ‘कर्तव्यमुद्रा’ कौतुकास्पद : गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने राबवलेले उपक्रम प्रशंसनीय आहे. या ट्रस्टच्या उपक्रमांची आढावा घेणारी ‘कर्तव्यमुद्रा’ ही पुस्तिका कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई गृह (ग्रामीण), वित, नियोजन राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन महाराष्ट्र राज्य यांनी काढले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.जयवंतराव शेलार, जि.प.सदस्य विजय पवार, पं.स.सदस्य पंजाबराव देसाई, सचिन यादव, तुकाराम डाकवे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

‘‘डाॅ.संदीप डाकवे हे नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. त्यांना माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा...!’’अशा शब्दात ना.देसाई यांनी डाकवे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. दरम्यान, त्यांनी ट्रस्टची ‘कर्तव्यमुद्रा’ ही कार्यपुस्तिका आवर्जून पाहिली. या पुस्तिकेत आतापर्यंतच्या विविध उपक्रमांचे फोटो, त्याबद्दलची थोडक्यात माहिती, मान्यवरांच्या सदिच्छा भेटी, थोरामोठयांचे शुभाशिर्वाद, वृत्तमानपत्रातील कात्रणे, मदतीसाठी आवाहन इ.ची माहिती आकर्षकपणे मांडली आहे.

डाॅ.डाकवे यांच्या कुशल नेतृत्वाखाली वाटचाल करत असलेल्या स्पंदन ट्रस्ट ची स्थापना मध्ये झाली असून या ट्रस्टने लोकसहभागातून 100 पेक्षा जास्त नावीण्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रम राबवत आपली छाप समाजमनावर उमटवली आहे.

यापूर्वी ना.शंभूराज देसाई यांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टला शुभसंदेश पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय अनेक उपक्रमांचे ना.देसाई यांच्या हस्ते शुभारंभ झाला आहे. "कर्तव्यमुद्रा" या पुस्तिकेचे उपस्थितांनी कौतुक केले आहे.