उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रीपदा सोबतच आमदारकीचाही राजीनामा ; बंडखोर आमदारांवर शेवटच्या भाषणातही खेद.


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरुन खाली खेचलं, त्यांना ते पुण्य मिळू दे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्यापासून आपण पुन्हा शिवसेना भवन मध्ये बसणार आहे. शिवसैनिकांची सेवा करणार आहे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा आदेश कायम ठेवत उद्धव ठाकरेंना उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून संवाद साधला. 

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

सरकार म्हणून सर्वप्रथम आपण शिवरायांच्या रायगड किल्ल्याच्या विकासाला निधी दिला. नंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला. आज औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असं केलं, शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार केलं, यामुळे आयुष्य सार्थक लागलं. 

एखादी गोष्ट चांगली सुरू असताना त्याला दृष्ट लागते. आज मला शरद पवार आणि सोनिया गांधींचे आभार मानायचं आहे. आजच्या औरंगाबादच्या नामांतरणाचा ठराव मांडताना शिवसेनेचे केवळ चारच मंत्री होते, याचं जरा दु:ख होतंय. साधी माणसं, कुणी रिक्षावाले, कुणी टपरीवाले तर कुणी हातभट्टीवाले... या सर्वांना शिवसेनाप्रमुखांनी माणसात आणलं, आमदार, खासदार बनवलं, मंत्री बनवलं. पण हे लोक मोठी झाल्यानंतर नाराज झाले. ज्यांना सर्वकाही दिलं ते नाराज झाले...पण ज्यांना काहीच दिलं नाही ते सोबत राहिले, तेच शिवसैनिक आहेत

शरद पवार सोनिया गांधींचे आभार

मला पवार साहेब आणि सोनियाजी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे खास धन्यवाद द्यायचे आहेत. 

नामांतरा बाबतीत त्यांनी सांगीतले...

खेद एका गोष्टीचे वाटले या ठरावाच्या वेळी मी, आदित्य, सुभाष देसाई आणि अनिल परब चारच शिवसेनेचे मंत्री होते. बाकी सगळे मंत्री… तुम्ही जाणता. हा ठराव मांडल्यानंतर काँग्रेस असो की राष्ट्रवादीने एका अक्षराने विरोध केला नाही. तातडीने मंजुरी दिली. त्यांना मी धन्यवाद देतो. ज्यांनी करून घ्ययाचं होतं ते नामानिराळे राहिले. दूर राहिले. ज्यांचा विरोध आहे हे भासवलं गेलं ते सोबत राहिले .
मी तुमच्याशी मनापासून बोलतोय. शिवसेनेला 56 वर्ष झाली. मी लहानपणापासून मी शिवसेना पाहतोय. रिक्षावाले, टपरीवाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल हातभट्टी वाले, त्यांना शिवसेना प्रमुखांनी चांगल्या मार्गावर आणलं. त्यांना नगरसेवक आमदार खासदार मंत्री बनवलं. मोठी झाली माणसं. मोठी झाल्यानंतर ज्यांना मोठं केलं ते विसरायला लागली. ज्यांना मोठं केलं त्यांना सत्ता आल्यानंतर जे काही देता येईल ते शक्य होतं ते दिलं. आजही ज्यांना देता येईल ते दिलं. ते लोकं नाराज. गेले चारपाच दिवस मातोश्रीला आल्यावर लोक येत आहे. साधी माणसं येत आहेत. साधी माणसं येत आहेत. साहेब काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत. कमाल आहे. ज्यांना दिलं ते नाराज. ज्यांना नाही दिल ते ते सोबत आहे… हे हिंमतीने सोबत आहे. याला म्हणतात माणूसकी शिवसेना आणि याला म्हणतात शिवसैनिक, हे आपलं नातं आहे. त्या नात्याच्या जोरावर शिवसेना मजबूत उभी राहिली. अनेक आव्हानं आली. पण या साध्या माणसाच्या साथीने परतवली आहे. आजही न्याय देवतेने निकाल दिला आहे. न्याय देवता म्हटल्यावर न्याय देवतेचा निकाल मान्य असायलाच पाहिजे.