मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे एकूण 35 आमदार असल्याचा दावा देखील केला जात आहे. या आमदारांचा एक फोटो देखील व्हयरल झाला आहे. एकनाथ शिंदे सोमवारी विधान परिषदेचा निकाल लागल्यापासून ते नॉटरिचेबल होते. मंगळवारी ते सुरतमध्ये होते. तर आज आसाममध्ये पोहोचले आहेत. एकनाथ शिंदेसोबत प्रहारचे बच्चू कडू देखील आहेत. बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली. मात्र इथूनपुढे हिंदुत्त्वाशी फारक घेणार नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. सोबतच एकनाथ शिंदे यांनी काल एक ट्विट देखील केले होते. त्या ट्विटमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा उल्लेख केला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख टाळण्यात आला होता. जाणून घेऊयात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून ते आतापर्यंत घडलेल्या 9 प्रमुख घडामोडी.
एकनाथ शिंदे हे मंगळवारी दिवसभर सुरतमध्ये होते. त्यानंतर ते सुरतहून आसामच्या दिशेने निघाले. एकनाथ शिंदे हे आसाममध्ये पोहोचले आहेत. त्यांचं विमान गुवाहाटीमध्ये पोहोचलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 33 तर अपक्षाचे 3 आमदार आहेत.
________________________________
त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रथमच या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झाली, मात्र यापुढे हिंदुत्त्वाशी फरकत घेणार नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
________________________________
दरम्यान मी शिवसेना सोडलेली नाही आणि सोडणारही नाही, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मात्र आता गर्व से कहों हम हिंदू है , हा बाळासाहेब ठाकरेंचा नारा पुन्हा देण्याची वेळ आल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
________________________________
एकनाथ शिंदेंनी केवळ शिवसेनेचे आमदारच नाही तर ठाकरे सरकारचे चार मंत्री देखील फोडले आहेत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि रोहयो राज्यमंत्री संदीपान भुमरे हे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत.
________________________________
मविआला सोडचिठ्ठी देऊन महाराष्ट्रात पुन्हा शिवसेना-भाजप युती व्हावी, गुजरात सोडताना शिवसेना बंडखोर प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया
________________________________
मध्यरात्रीनंतर सुरतच्या विमानतळावर तगडा फौजफाटा, गुजरात पोलिसांच्या सुरक्षा कडेत सेनेचे बंडखोर आमदार स्पाईस जेटच्या विमानातून आसामच्या गुवाहाटीकडे रवाना, गुवाहाटीला पोहोचले.
________________________________
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 33 आमदारांसोबत मविआतून बच्चू कडूंच्या प्रहारलाही फोडलं, 1 आमदारासहीत खुद्द बच्चू कडू सुद्धा शिंदेंच्या गोटात
________________________________
बंडानंतर रात्री उशिरा सेनेतल्या नाराज आमदारांचा शिंदेंकडून नवा गट, मात्र इकडे मुंबईत शिंदेंना हटवून अजय चौधरींची सेनेकडून गटनेतेपदी निवड.
________________________________
एकनाथ शिंदेंच्या बंडाला भाजपाचे बळ भाजपचे नेते एकनाथ शिंदेंसोबत
________________________________