ज्ञानाची शिदोरी’ उपक्रमात सहभागी होण्याचे ‘स्पंदन’ ट्रस्ट चे आवाहन


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

ग्रामीण विभागातील दुर्गम व खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरजू, होतकरु व हुशार विद्यार्थ्यांना ‘ज्ञानाची शिदोरी’ उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी समाजातील जास्तीत जास्त लोकांनी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

लोकसहभागातून नेहमीच नावीण्यपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट चा हातखंडा आहे. स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात चांगले योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे.यामध्ये ज्ञानाची शिदोरी उपक्रमामधून रु.28,100/- किमतीचे शैक्षणिक साहित्य वाटप, एक वही एक पेन उपक्रमांतर्गत रु.16,000/- किमतीचे शैक्षणिक साहित्य वाटप, माणुसकीच्या वहया उपक्रमामधून रु.11,000/- किमतीचे शालेय साहित्य वाटप, ग्रंथतुलेतून रु.11,000/- किमतीची पुस्तके वाटप, डाकेवाडी शाळेला रु.5,000/- किमतीचे तक्ते वाटप, 10 गणवेश वाटप, विद्यार्थ्यांच्या फी साठी रु.6,000/-, जि.प.प्राथ.शाळा डाकेवाडी (काळगांव) रंगकाम व बोलक्या भिंती, कराड नगरपरिषद अंगणवाडी रंगकाम व बोलक्या भिंती, जि.प.प्राथ. केंद्रशाळा कुठरे व जांभूळवाडीला महापुरुषाच्या प्रतिमांचे वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा घरी जावून सत्कार, मतीमंद मुलांच्य शाळेस मदत, 3 री विद्यार्थी स्वाध्याय माला वितरण, विनामूल्य भिंती रेखाटन, किल्ले बनवा स्पर्धा, ग्रंथालयांना दिवाळी अंक वितरण, मान्यवरांचे स्वागत पुस्तके देवून इ. शैक्षणिक उठावास मदत केली आहे.

सदर उपक्रमात रोख रक्कम किंवा वस्तूच्या स्वरुपात मदत स्वीकारली जाईल. तसेच आपण आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत, स्नेहीजनांच्या स्मृतीप्रित्यर्थ शैक्षणिक साहित्य देवून सहभाग घेवू शकता असेही आवाहन डाॅ.डाकवे यांनी केले आहे.

_________________________________

समाजातील दानशूर व्यक्ती, व्यावसायिक, संस्था, ट्रस्ट यांनी ‘ज्ञानाची शिदोरी’ या उपक्रमासाठी मदत करावी. त्यांच्या सहकार्यामुळे ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत होईल. तसेच या उपक्रमात भरघोस मदत केलेल्यांना ट्रस्टच्या वतीने आकर्षक ‘कृतज्ञता सन्मानपत्र’ देण्यात येणार आहे, असे मत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केले आहे.

________________________________

Popular posts
बंडखोरांना इशारा ते राजीनाम्याची तयारी... उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
इमेज
वा..वा..वा...प्रत्यक्षात भेटू त्यावेळी काढू फोटो... प्रवीणजी तरडे यांनी दिली स्वतःच्या चित्राला दाद
इमेज
कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश
इमेज
काजारवाडी येथील वि.का.स. सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी सुभाष काजारी तर व्हा. चेअरमन पदी हणमंत जंगम यांची बिनविरोध निवड.
इमेज