काजारवाडी येथील वि.का.स. सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी सुभाष काजारी तर व्हा. चेअरमन पदी हणमंत जंगम यांची बिनविरोध निवड.

  

तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
खळे काजारवाडी ता पाटण येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन, व्हा. चेअरमन पदाच्या निवडी निवडणूक निर्णय अधिकारी संजय मोरे  यांचे अध्यक्षते खाली पार पडल्या. 

यावेळी  एकमताने चेअरमन पदी सुभाष रामचंद्र काजारी तर व्हा.चेअरमन पदी हणमंत रघुनाथ जंगम यांची बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली. 

यावेळी नवनिर्वाचित संचालक  पाडुरंग नाना काजारी, महेंद्र मोहन काजारी, सुभाष रामचंद्र काजारी, प्रल्हाद यशवंत घागरे, प्रकाश किसन डुबल, सुरेश विठ्ठल डुबल, राजेश शंकर रजपूत, निवास केशव शिद्रुक, तानूबाई आनंदा काजरी सुमन राजाराम डुबल, हनमंत रघुनाथ जंगम आदी संचालकांची  प्रमुख उपस्थिती होती व  पॅनेल प्रमुख  उपस्थित होते रामभाऊ डुबल, सुभाष काजारी, रमेश राजपूत, सचिन काजारी,संभाजी काजारी,  बाळकृष्ण काजारी सर, दिलीप अण्णा फौजी,  कार्यकर्ते,ग्रामस्थ, यांनी मोठा विजयी जल्लोष साजरा केला.

नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन तसेच सर्व संचालक यांचा खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते व जन सहकार पतसंस्थेचे चेअरमन मारुतीराव मोळावडे काजारवाडी चे युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
Popular posts
बंडखोरांना इशारा ते राजीनाम्याची तयारी... उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
इमेज
वा..वा..वा...प्रत्यक्षात भेटू त्यावेळी काढू फोटो... प्रवीणजी तरडे यांनी दिली स्वतःच्या चित्राला दाद
इमेज
कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश
इमेज
ज्ञानाची शिदोरी’ उपक्रमात सहभागी होण्याचे ‘स्पंदन’ ट्रस्ट चे आवाहन
इमेज