खळे वि. का.स.सेवा सोसायटी चेअरमन पदी अशोक पानवळ तर व्हा चेअरमन पदी उत्तम घोरपडे यांची बिनविरोध निवड.

 


तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

     खळे ता. पाटण वि. का. स.सेवा सोसायटीची चेअरमन व्हा चेअरमन निवड नुकतीच सोसायटी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी आर. आर मोरे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली त्यांना सचिव किरण कारंडे यांनी सहकार्य केले. यावेळी  एकमताने चेअरमन पदी अशोक ईश्वर पानवळ तर व्हा. चेअरमन पदी उत्तम गणपती घोरपडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

     यावेळी नवनिर्वाचित संचालक  रविंद्र बाळू पाटील, सुहास रघुनाथ कचरे, आनंदा लक्ष्मण काजारी, उत्तम गणपती घोरपडे, शिवाजी शामराव कचरे, अशोक ईश्वर पानवळ, तुकाराम बंडू कचरे,कचरे सुरेखा सुभाष, देसाई शांताबाई दादू,महापुरे लव्हाजी शंकर, जंगम ज्ञानदेव शंकर,गुजर सुहास मारुती, निवडी वेळी उपस्थित होते.  ना.शंभूराज देसाई साहेब शेतकरी विकास पॅनेल प्रमुख  सरपंच संदीप टोळे, संदीप कचरे, प्रफुल कचरे, गजानन पाटील, महादेव कचरे, सचिन कचरे,नामदेव पाटील,दिलीप पाटील, मोहन कचरे, निवास कचरे, चंद्रकांत टोळे, बाबुराव कचरे  या मान्यवरांच्या हस्ते नूतन चेअरमन, व्हा चेअरमन, सर्व संचालक यांचे अभिनंदन करण्यात आले यानंतर विजयी जल्लोष साजरा केला.