मंद्रुळकोळे सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी सुभाष पाटील तर व्हा.चेअरमन पदी दादासाहेब साळुंखे

नवनिर्वाचित चेअरमन ,व्हा. चेअरमन व संचालक मंडळासमवेत हिंदुराव पाटील, अभिजीत पाटील व इतर

ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
पाटण तालुक्यात राजकियद्दष्ट्या अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मंद्रुळकोळे येथील वि.का.स. सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सुभाषराव बाबुराव पाटील तर व्हा.चेअरमनपदी दादासो सुरेश साळुंखे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

            यावेळी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी हिंदुराव पाटील,काँग्रेसचे जिल्हा सदस्य अभिजीत पाटील, खरेदी विक्री संघाचे संचालक आत्माराम कदम, तसेच नवनिर्वाचित संचालक संजय पाटील, अशोकराव पाटील, बापू मोरे, शिवाजी शिंदे, जोतीराम काटकर ,पांडुरंग पुजारी, सदाशिव मदने, नथुराम ढेब धोंडीराम कांबळे, कमल काळुगडे, निलम पवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पाटणच्या सह.अधिकारी गितांजली कुंभार यांनी काम पाहिले पदाधिकारी निवडी जाहिर होताच कार्यकर्त्यानी फटाक्यांची अतिषबाजी व गुलाल उधळून आनंद साजरा केला.

___________________________________

 विरोधकांनी सोसायटी बदनाम करण्यासाठी विनाकारण सोसायटीची निवडणूक लादली पण आम्ही पुढच्या काळात सर्वांना बरोबर घेवून सर्वांचा योग्य सन्मान देत संस्था व सभासद हिताला प्राधान्य देऊन काम करू.
- हिंदुराव पाटील प्रदेश प्रतिनिधी काँग्रेस                         
___________________________________