भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील 75 सेनानींना कलेतून मानवंदना

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
जगाच्या पाठीवर अतुलनीय ठरलेला भारतीय स्वातंत्र्य संग्राम यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. या स्वातंत्रय लढयाने देशासह साऱ्या जगाला दिशा दिली. यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे क्रांतीकारक, देशभक्त, स्वातंत्र्य सेनानी, समाजसुधारक, संत या सर्वांच्या योगदानामुळे आज आपण स्वातंत्र्य अनुभवत आहोत. यातील 75 सेनांनींची स्केचेस तयार करुन त्यांना कलेतून मानवंदना देण्याचा प्रयत्न केला आहे पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील विश्वविक्रमवीर कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी. या रेखाटलेल्या स्केचेसचे प्रदर्शन भरवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

प्रचंड भारावलेल्या काळात या मातीत जी नररत्ने जन्मली त्यांनी इंग्रजांच्या बंदुकांपुढे आपल्या छातीची ढाल  केली. ही माणसं देशस्वातंत्र्याचे खरे योध्दे होय. या व्यक्तिंचा इतिहास त्यांची शौर्यगाथा मांडण्याचा प्रयत्न डाॅ.डाकवे कमीत कमी रेषांमध्ये क्रांतीकारक, समाजसुधारक यांची ही स्केचेस साकारुन केला आहे.  

राजमाता जिजाऊ, छ.शिवाजी महाराज, छ.संभाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, राजश्री शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर, मंगल पांडे, संत बसवेश्वर, संत गाडगे महाराज, राजा राम मोहन राॅय, महात्मा जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, बिरसा मुंडा, दामोदर हरी चाफेकर, बाळकृष्ण हरी चाफेकर, वासुदेव हरी चाफेकर, लोकमान्य टिळक, क्रांतीसिंह नाना पाटील, शिवराज राजगुरु, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, अब्दुल कलाम आझाद, अमरीत कौर, अमर शेख, वासुदेव बळवंत फडके, शिवराम राजगुरु, लहुजी साळवे, उशा मेहता, संत तुकडोजी महाराज, स्वामी विवेकानंद, अशफाकउल्ला खान, वीर सावरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, टिपू सुलतान, तात्या टोपे, सुखदेव, बेगम हजरत महल, सरदार वल्लभभाई पटेल, सुचेता कृपलानी, सुर्यसेन, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, सेनापती बापट, सावित्रीबाई फुले, गणेश वासुदेव जोशी-सार्वजनिक काका, सरोजिनी नायडू, राणी चेन्नम्मा, पंजाबराव देशमुख, पंडिता रमाबाई, भाऊ दाजी लाड, महात्मा गांधी, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, मादाम कामा, ऍनी बेझंट, कमलादेवी, दुर्गाबाई देशमुख, लाला लजपतराय, लक्ष्मी सेहगल, कुंवरसिंह, प्रितीलता वड्डेदार, खुदीराम बोस, कल्पना दत्ता, दादाभाई नौरोजी, इंदिरा गांधी, दादोबा पांडूरंग तर्खडकर, गोपाळ कृष्ण गोखले, उमाजी नाईक, लालबहाद्दुर शास्त्री, हेमू कलानी, गोपाळ हरी देशमुख, बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकर शेठ, चंद्रशेखर आझाद, बिपिनचंद्र पाल, पंडित जवाहरलाल नेहरु, यशवंतराव चव्हाण, प्रबोधनकार ठाकरे या थोर महापुरुषांची स्केचेस डाॅ.संदीप डाकवे यांनी रेखाटली आहेत.

केवळ चित्रे न रेखाटता कलेतून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम डाॅ.डाकवे वेळोवेळी करत असतात. आपल्या कलेला त्यांनी समाजप्रबोधनाचे माध्यम बनवले आहे. यामुळेच त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून 4 वेळा तर विविध संस्थांनी सुमारे 55 हून अधिक पुरस्कार देवून गौरवले आहे. नेहमीच वैविध्यपूर्ण कलात्मक उपक्रम राबवत असलेल्या डाॅ.संदीप डाकवे यांनी 75 स्वातंतत्र्य सेनानींची केलेली स्केचेस हा कौतुकाचा विषय झाला आहे.

___________________________________

 वीरांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी स्केचेस....

ज्यांच्या त्यागामुळे आज आपण स्वातंत्र्य अनुभवत आहोत, त्या क्रांतीकारक, समाजसुधारक, थोर स्वातंत्र्यसेनानी यांची आठवण रहावी, त्यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 75 सेनांनीची स्केचेस काढण्याचा प्रयत्न केला आहे. अशी प्रतिक्रिया डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केली आहे.

___________________________________