राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त ढेबेवाडी विभाग राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वृक्षारोपण.

 


ढेबेवाडी| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

  कराड ढेबेवाडी रोड लागत ढेबेवाडी पुल ते स्मशानभूमी या ठिकाणी 23 वृक्ष लावून राष्ट्रवादी पक्षाचा 23 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपूरक असा राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी साजरा केला त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक आत्माराम कदम, जेष्ठ मार्गदर्शक डी एस पाटील सर, ख.वी.सं संचालक प्रमोद देसाई, पाटण अर्बन बँकेचे संचालक अंकुश मोंडे, मंद्रूळ वि.का.स सेवा सोसायटीचे चेअरमन सुभाष पाटील, बनपुरीचे मा. सरपंच डॉ. शिवाजी पवार, सणबुर ग्रा.पं मा.सदस्य विशाल जाधव, ढेबेवाडी कुंभारगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष दादासाहेब कडव, पाटण तालुका भटक्या विमुक्त जाती जमती सेल राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष सचिन वाघमारे, पत्रकार प्रमोद पाटील, सुभाष ढेब, पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे सरचिटणीस सदाभाऊ साळुंखे, पाटण राष्ट्रवादी काँग्रेसचे खजिनदार आण्णासो लोहार, मंद्रूळकोळे गावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पी डी पाटील, ढेबेवाडी विभाग राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष वैभव पांढरपट्टे, ढेबेवाडी विभाग राष्ट्रवादी काँग्रेस चे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोंडे, सातरचे मा.सरपंच मारुती साळुंखे, मंद्रूळखुर्दचे समाजिक कार्यकर्ते विजय सोनवने आदी मान्यवर उपस्थित होते.