गुढे ता.पाटण येथील वि.का.स. सेवा सोसायटी चेअरमन पदी रविंद्र पाटील तर व्हा. चेअरमन पदी शिवाजी माने यांची बिनविरोध निवड.

 


तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा :
 गुढे ता पाटण येथे शिवसेना पुरस्कृत श्री काळंबादेवी शेतकरी परिवर्तन पॅनेलने 20 वर्षांनंतर सत्तातर करत 13-0 ने विजय संपादन करत विरोधी जोतिर्लिंग शेतकरी विकास पॅनेलचा दारुण पराभव केला होता.     

 गुढे ता.पाटण येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली होती त्या अनुषंगाने चेअरमन व्हा. चेअरमन पदाच्या निवडी निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना थोरात यांचे अध्यक्षते खाली पार पडल्या. यावेळी एकमताने चेअरमन पदी रविंद्र पाटील (बापू) तर व्हा. चेअरमन पदी शिवाजी माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली.      

यावेळी नूतन संचालक भाऊसो शंकर कदम, अशोक हिंदुराव देसाई, नारायण परशराम पाटील, रविंद्र आनंदराव पाटील, श्रीरंग राजाराम बोबडे, हणमंत श्रीपती मस्कर, शिवाजी श्रीपती माने, उमेश शामराव शिबे, कांचन आनंदा कदम, अनुसया यशवंत पाटील, दिपक परशराम सुतार, सदाशिव महादेव नलवडे, अधिक बाबुराव तडाखे यांची विशेष उपस्थिती होती. 

पॅनेल प्रमुख शामराव कदम, सरपंच आत्माराम पाचपुते, आबासाहेब बोत्रे, अशोकराव दिंडे, सुभाष पाटील, आबा नांगरे पाटील, धनाजी पाचपुते, जयवंत शिबे, अरुण शिबे, गणेश शिबे, धनाजी दिंडे, जयवंत दिंडे, सागर पाटील, दीपक पाटील, निलेश पाटील, रामचंद्र पाटील, पप्पू पाटील, संभाजी पाचपुते, बाबू माने, आप्पासो नलवडे, आबासो शिबे, आबासो भांडवलकर, विश्रांत कदम, आनंदा महाडिक, मिलिंद जाधव , दिपक रामचंद्र कदम, सुभाष पाटील, शंकर कदम, गुढे ग्रा.पं. माजी सदस्य संजय कदम, कार्यकर्ते यांनी नवनिर्वाचित चेअरमन, व्हा चेअरमन यांचे अभिनंदन केले. यावेळी मोठा विजयी जल्लोष साजरा केला.