श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी घोगाव चे GPAT परीक्षेत घवघवीत यश.कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्था संचलित श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालया मधील 7 विद्यार्थ्यांनी GPAT परीक्षेत उज्वल यश संपादित केले. 

भारत सरकारच्या उच्च शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील GPAT परीक्षेत श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी घोगाव येथील 7 विद्यार्थी GPAT उत्तीर्ण झाले. अखिल भारतीय स्तरावर घेण्यात येणारी GPAT परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदव्यूत्तर पदवी एम फार्मसी चे शिक्षण घेत असताना अखिल भारतीय तंत्र शिक्षण संचालनालय नवी दिल्ली यांच्या कडून शिष्यवृत्ती देण्यात येते. महाविद्यालयात अंतिम वर्ष बी फार्मसी मध्ये शिकत असलेल्या शुभम गुरव,कशिश मुल्ला, ओमकार सूर्यवंशी, आनंद गवळी, श्वेता कुंभार, ऋतुजा केळुसकर, आकांक्षा सावंत या विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले.

संस्थेचे सचिव श्री प्रसून जोहरी यांनी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करताना ते म्हणाले श्री संतकृपा शिक्षण संस्था ही ग्रामीण भागातील अग्रेसर संस्था म्हणून नावारूपाला आली आहे. त्यात या यशाने आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आपल्या संस्थेची झपाट्याने वाढ होत आहे. विद्यार्थ्यांचा आपल्या महाविद्यालयाकडे प्रवेशाचा ओघ पाहता यावर्षी आपण बी.फार्मसी च्या प्रवेश क्षमतेत वाढ करत आहोत, एम फार्मसी मध्ये फार्माकोलॉजी हा विषय नव्याने घेत आहोत, त्याच बरोबर डी फार्म ची आणखी एक तुकडी सुरू करत आहोत. याचाही विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

 विद्यार्थ्यांच्या या उज्वल यशाबद्दल श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, संस्थेच्या ट्रस्टी प्राजक्ता जोहरी,संस्थेचे सर्व संचालक, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयानंद अरलेलीमठ,समन्वयक डॉ. आडवीराव,डी. फार्मसी च्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, श्री संतकृपा इंजिनिअरिंग (बीटेक) चे प्राचार्य डॉ.स्वानंद कुलकर्णी, श्री संतकृपा ज्युनिअर कॉलेजच्या च्या प्राचार्या सौ.पुष्पा पाटील, संतकृपा इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सौ.सुप्रिया पाटील, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, फार्मसी महाविद्यालयाचे विद्यार्थी वर्ग यांनी अभिनंदन केले.