चक्क मोरपीसावर साकारले शाहू महाराजांचे चित्र



डाॅ.संदीप डाकवे यांनी चक्क मोरपीसावर साकारले शाहू महाराजांचे चित्र.
तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील विश्वविक्रमवीर चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी राजर्शी शाहू महाराज यांचे चित्र चक्क मोरपीासावर रेखाटून महाराजांना अनोखे अभिवादन केले आहे. शुक्रवारदि.6मे,2022 रोजी राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथीआहे.यंदा राजर्षी शाहू महाराजाच्या स्मृती शताब्दीच्याऔचित्याने लोकराजा शाहू कृतज्ञता पर्व हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर डाॅ.संदीप डाकवे यांनी मोपिसावर राजर्षी शाहू महाराज यांचे अप्रतिम चित्र रेखाटले आहे. या अनोख्या चित्राचे परिसरातून कौतुक होत आहे.

डाॅ.संदीप आपल्या जादुई चित्रकलेच्या माध्यमातून विविध चित्रे साकारत आहेत. त्यांचे शिक्षण एटीडी, बीए, मास्टर ऑफ जर्नालिझम, ग्राफीक डिझायनींग, डिप्लोमा इन नॅचरोपॅथी असे झाले आहे. आतापर्यंत त्यांनी अनेकांची शब्दचित्रे रेखाटली आहेत.

डाॅ.संदीप डाकवे यांनी शब्दचित्राबरोबर खडूतून अष्टविनायक, मोरपीस-जाळीदार पिंपळपानावर कलाकृती, अक्षरगणेशा, व्यंगचित्रे, पोस्टर रेखाटन, पेपर कटींग आर्ट, रांगोळी, पुस्तकांची मुखपृष्ठे, कॅलिग्राफी, छत्रीवर व्यसनमुक्ती संदेश इ.कलात्मक उपक्रम राबवले आहेत. तसेच 12,000 हून अधिक विविध क्षेत्रातील दिग्गजांना त्यांची हुबेहुब चित्रे काढत सरप्राईज भेटी दिली आहेत. त्यांच्या विविध छंदाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’, या पुस्तकात तीनदा, वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड, ‘हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड’ मध्ये एकदा झाली आहे.

डाॅ.डाकवे यांना चित्रकलेबरोबरच लेखनाचा छंद असून त्यांची 7 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तर 6 पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांनी पत्रकारिता, चित्रकारिता, लेखन, साहित्य यात आपले वेगळेपण सिध्द केले आहे. त्यामुळे त्यांचा शासन दरबारी 4 वेळा तर विविध संस्थांनी सुमारे 50 हून अधिक पुरस्कार देवून गौरवले आहे.

केवळ चित्रे न रेखाटता यामधून मिळालेल्या मानधनातून नाम फाऊंडेशन 35 हजार, केरळ पुरग्रस्तांना 21 हजार, आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीजला 5 हजार, माजी सैनिक हणमंतराव पाटील 5 हजार, मुख्यमंत्री सहाय्यता निधी 7 हजार, ईशिता पाचुपते 5 हजार,  शैक्षणिक फीसाठी 6 हजार, भारत के वीर या खात्यात 1 हजार अशी सामाजिक बांधिलकी जपत मदत केली आहे.

याशिवाय सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी स्थापन केलेल्या स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट मधून सुमारे लाख रुपयाचे शैक्षणिक साहित्य वितरित केले आहे. भविष्यात त्यांनी पत्रकारिता, साहित्यिक, सामाजिक, कला क्षेत्रात उज्ज्वल वाटचाल करावी यासाठी शुभेच्छा...!