कुठरे वि.का.स सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी बाबुराव हरिबा सपकाळ तर व्हा. चेअरमन पदी वैशाली अनिल शिंदे यांची बिनविरोध निवड.


तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

  कुठरे ता.पाटण येथील वि का स सेवा सोसायटी वर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली शेतकरी परिवर्तन पॅनल ने निनाईदेवी सहकार पॅनेलचा दारुण पराभव करून एकहाती सत्ता घेत सत्तांतर करून राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का दिला होता. बुधवार दि 25/5/2022 रोजी वि का स सेवा सोसायटीच्या नुतन चेअरमन पदी बाबुराव हरिबा सपकाळ तर व्हा .चेअरमन पदी सौ वैशाली अनिल शिंदे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.  

    गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व अनिल शिंदे,बबनराव पाटील,राजाराम पाटील, सागर नलवडे,सयाजी पाटील ,प्रभाकर शेलार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी परिवर्तन पॅनलने सत्ताधारी राष्ट्रवादी गटाचा धुव्वा उडवत पहिल्यांदाच शिवसेनेने कुठरे विकास सेवा सोसायटीवर भगवा झेंडा उभारला. मोठे यश संपादन केले.

      शेतकरी परिवर्तन पॅनल च्या माध्यमातून निवडीवेळी नवनिर्वाचित संचालक दादासो आनंद कदम,शंकर महादू देसाई,श्रीरंग शंकर पवार,जयचंद बाबुराव पाटील,राजाराम बाळू पाटील,रामचंद्र शामराव मुंढेकर,कृष्णत बाबुराव सुपूगडे,रामचंद्र बाळकू सुर्वे,सौ वैशाली अनिल शिंदे,सौ वनिता सोपान कुंभार, मोहन दादु भिंगारदेवे,रमेश गणपती टोनपे,बाबुराव हरिबा सपकाळ उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी कुंभार मॅडम यांनी निवड प्रक्रिया पार पाडली. चेअरमन पदी बाबुराव हरिबा सपकाळ तर व्हा .चेअरमन पदी सौ वैशाली अनिल शिंदे यांची एकमताने बिनविरोध निवड झाल्याचे त्यांनी जाहीर केले.

      या वेळी बाळासाहेब देसाई कारखान्याचे संचालक बबनराव पाटील,मर्चंट सिंडिकेट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल शिंदे ,सरपंच शिवाजी मोरे,शंकरराव पवार,सागर पाटील, अरुण मोळावडे ,हणमंत मोळावडे ,कुंडलिक पाटील,आत्माराम मोळावडे,शत्रुघ्न पवार,प्रदीप सुतार,प्रभाकर शेलार,शिवाजी पाटील, आदी मान्यवर व ग्रामस्थ तसेच सभासद उपस्थित होते.

      उपस्थित सर्व मान्यवरांनी संचालक व नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन केले.