श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान येळगांव, लायन्स क्लब सातारा अजिंक्य व ग्रामपंचायत येळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन.

कर्नल डॉ प्रदीप पाटील यांचा शिवछत्रपती प्रतिष्ठान येळगाव च्या वतीने सत्कार. 

येळगाव|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

येळगाव तालुका कराड येथील श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान येळगांव, लायन्स क्लब सातारा अजिंक्य व ग्रामपंचायत येळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने येथील प्राथमिक आरोग्य केंंद्रात झालेल्या मोफत आरोग्य शिबिरात तीनशेवर रूग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यात आला.

शिबिरात तपासणी झालेल्यां रुग्णां पैकी ३० रुग्णांची मोतीबिंदू ऑपरेशन साठी निवड झाली आहे. त्यांचे ऑपरेशन येत्या दोन दिवसात लाहोटी हॉस्पिटल कराड व लायन्स क्लब अजिंक्य सातारा याच्या वतीने अल्प खर्चात होणार आहे.

शिबीरात येळगांवचे सुपुत्र व पुणे येथील प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉक्टर कर्नल प्रदीप पाटील यांनी त्वचारोगावरील रूग्णांची तपासणी केली. कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ.केदार गोरड यांनी पोटविकारावरील रूग्णांची तर लायन्स आय हॉस्पिटल कराडच्या वतीने डॉ प्रियांका बोलके यांनी नेत्ररोगावरील रूग्णांची तपासणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.शुभांगी डांगे  व स्टाफने सर्व रूग्णांचा रक्तदाब व शुगरची तपासणी केली. यावेळी सर्व रूग्णांना आवश्यक त्या औषधांचा मोफत पुरवठा करण्यात आला.

प्रारंभी उपस्थित सर्व डॉक्टर व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन  करण्यात आले.

यावेळी प्रतिष्ठान व ग्रामपंचायतीच्या वतीने उपस्थित डॉक्टर,लायन्स क्लबचे पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. 

या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल सहभागी डॉक्टर व प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांचा स्मृति चिन्ह देवून  लायन्स क्लब सातारा अजिंक्य यांच्यावतीने  सत्कार करण्यात आला. 

यावेळी लायन्स क्लबचे संस्थापक बाळकृष्ण जाधव यांनी मनोगत व्यक्त करून प्रतिष्ठानच्या कामाचे कौतुक केले. प्रतिष्ठानने हाती घेतलेल्या शिवमंदिराच्या नूतनीकरण व सुशोभीकरण कार्यासाठी भरीव आर्थिक मदतीचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमास शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत शेवाळे, लायन्स क्लबचे अध्यक्ष अशोक थोरात, सुनिल पाटणे, येवती प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. नरेंद्र माळी, येळगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.सुभाष पाटील, डॉ.डांगे मॅडम, डॉ.प्रशांत माने त्यांचा सर्व स्टाफ, यासह अंगणवाडी सेविका, आशा वर्कर नानेगावकर, यादव, माने मॅडम यांचे बहुमोल सहकार्य लाभले.  

ग्रामपंचायत सद्स्य नितिन साळूंखे, चेअरमन अक्षय शेटे, माजी उपसरपंच सुरेश माने, राजेंद्र पाटील, सुरेश पाटील, हरीदास सोरटे, संजय शेवाळे, वसंतराव पाटील, बाजीराव पाटील यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. 

 शिबिर आयोजित करण्यात महत्वाची भूमिका पार पाडलेले अरविंद शेवाळे यांचा प्रतिष्ठान, लायन्स क्लब व ग्रामपंचायत यांच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला. 

 शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे सचिव, आकाराम शेटे, दिलीप नायकवडी, मनोज पांगे, दिपक गोडसे, संजय पाटील, प्रशांत तेली या तरुणांनी योगदान दिले.  

 देवीदास सोरटे यांनी प्रास्ताविक केले, माजी उपसरपंच संतोष माने यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पवार यांनी केले.