खळे वि.का.स सेवा सोसायटीत ना. शंभूराज देसाई साहेब शेतकरी पॅनेलचा दणदणीत विजय. तर विरोधी ज्योतिर्लिंग शेतकरी पॅनेलचा दारुण पराभव.

तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा : 

खळे ता पाटण वि.का.स सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली या निवडणुकीत ना. शंभूराज देसाई शेतकरी विकास पॅनेल व श्री जोतिर्लिग शेतकरी पॅनेल यांचे मध्ये काटे की टक्कर लढत झाली. 
काल सायंकाळी निकाल लागला यामध्ये ना. शंभूराज देसाई शेतकरी विकास पॅनलने 13 पैकी 12 जागा जिंकून मोठा विजय प्राप्त केला तर विरोधी ज्योतिर्लिंग शेतकरी पॅनेलचा दारुण पराभव झाला. या पॅनेलचा एकमेव एक उमेदवार जिंकून आला त्यामुळे 12 -- 1 अशी विजयी लढत पाहायला मिळाली. 
सभासदांनी ना.शंभूराज देसाई शेतकरी विकास पॅनलच्या नेतृत्वावर विश्वास टाकला व ना.शंभूराज देसाई शेतकरी विकास पॅनलच्या १३ पैकी 12 उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केले.
 या अभूतपूर्व विजयानंतर नूतन विजयी उमेदवार, पॅनेलचे कार्यकर्ते यांनी गुलाल उधळत मोठा विजयी जल्लोष साजरा केला.               
 ना. शंभूराज देसाई साहेब शेतकरी विकास पॅनेलचे विजयी उमेदवार रविंद्र बाळू पाटील, सुहास रघुनाथ कचरे, आनंदा लक्ष्मण काजारी, उत्तम गणपती घोरपडे, शिवाजी शामराव कचरे, अशोक ईश्वर पानवळ, तुकाराम बंडू कचरे. कचरे सुरेखा सुभाष, देसाई शांताबाई दादू , महापुरे लव्हाजी शंकर, जंगम ज्ञानदेव शंकर तर गुजर सुहास मारुती हे एकमेव उमेदवार बिनविरोध विजयी झाले.तर विरोधी महाविकास आघाडीच्या श्री जोतिर्लिग शेतकरी विकास पॅनेलला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला. 
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय मोरे यांनी काम पहिले.
  या विजया नंतर ना.शंभूराज देसाई शेतकरी विकास पॅनेलचे प्रमुख माजी सरपंच संदीप टोळे, संदीप कचरे, प्रफुल कचरे, गजानन पाटील, महादेव कचरे, सचिन कचरे, नामदेव पाटील व विजयी सर्व 12 संचालक, तरुण कार्यकर्ते यांनी विजयी जल्लोष साजरा केला.
    ना.शंभूराज देसाई शेतकरी विकास पॅनेलचे प्रमुख युवा नेते, सर्व विजयी उमेदवार व सभासद यांचे राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी अभिनंदन केले.
Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
काळगांव मध्ये तब्बल 22 वर्षानंतर भेटले वर्गमित्र
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..
इमेज